ETV Bharat / state

केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या गावातील युवा शेतकऱ्याची कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या - Suicide of small land holder farmer in Akola due to debt

अकोल्यातील पळसो बढे या गावातील एका युवा अल्पभुधारक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा आणि सरकारची मदत न मिळाल्याने आत्महत्या केली. विशेष म्हणजे हा शेतकरी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याच गावचा रहिवासी आहे..

अकोल्यात युवा शेतकऱ्याची कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या
author img

By

Published : Nov 16, 2019, 11:09 PM IST

अकोला - परतीच्या पावसामुळे हाती आलेले सोयाबीन पीक वाया गेले, तसेच लागवडीसाठी घेतलेल्या शेतीतील पीकही संपूर्ण खराब झाल्यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या अकोल्यातील एका युवा शेतकऱ्याने शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. अमोल बाळू इंगळे (वय 26) असे या आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे हा शेतकरी केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याच गावातील रहिवासी आहे.

अकोल्यात युवा शेतकऱ्याची कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या...

हेही वाचा... शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर, राज्यपालांची घोषणा

अकोला तालुक्यातील पळसो बढे या गावात राहणारे अमोल इंगळे या युवा शेतकऱ्याने घराजवळील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे आत्महत्या करण्यामागील नेमके कारण समजू शकले नसले, तरी त्याच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहिती नुसार, अमोलने कर्जबाजारीपणा आणि शेतीचे नुकसान झाल्यानंतर सरकारची कसलीही मदत वेळेवर न मिळाल्याने आत्महत्या केल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा... घोडे धुण्यासाठी नदीत उतरलेल्या सख्ख्या भावांचा मृत्यू; खोलीचा अंदाज न आल्याने बुडाले

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पश्चात तीन बहिणी, दोन भाऊ, आई व वडील असा परिवार आहे. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याच गावातील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने, मंत्र्यांचे स्वतःच्या भागातच लक्ष नसल्याचे बोलले जात आहे. तसेच भाजपचे आमदार रणधीर सावरकर हे या भागाचे आमदार आहेत.

Intro:अकोला - परतीच्या पावसामुळे हातचे सोयाबीन पीक गेल्यामुळे आणि लागवडींने घेतलेल्या शेतीतीलही पीक संपूर्ण खराब झाल्यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने आज दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतक हे केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे आणि भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांच्या गावातील रहिवासी आहेत. त्यामुळे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून अमोल बाळू इंगळे (26) असे मृतक युवा शेतकऱ्याचे नाव आहे.Body:अकोला तालुक्यातील पळसो बढे या गावात राहणारे अमोल बाळू या गावात राहणारे अमोल बाळू अमोल बाळू इंगळे या युवा शेतकऱ्याने घराच्या मागील अंगणामध्ये असलेल्या निबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्ये मागील नेमके कारण कळू शकले नसले तरी परतीच्या पावसामुळे या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पूर्णपणे खराब झाले आहे. त्यामुळे हा शेतकरी आर्थिक विवंचनेत होता. तसेच जवळच असलेल्या आठ एकर शेतातही त्यांनी लागवड केली लागवड केली शेतातही त्यांनी लागवड केली लागवड केली होती. तेही पिक त्याच्या हातून गेल्यामुळे तो चिंताग्रस्त झाला होता. त्यामुळे या आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या युवा शेतकऱ्याने शेतकऱ्याने टोकाची भूमिका घेत आत्महत्येचा पर्याय निवडला.
सहा महिण्याआधी त्याने त्याच्या बहिणीचे लग्न केले होते. तसेच शेतातील पीक घेण्यासाठी त्याने कर्ज घेतले होते. कर्जबाजारी पणामुळेही त्याने आत्महत्या केली असे त्याच्या काकांचे म्हणणे आहे. त्याच्या पश्चात तीन बहिणी, दोन भाऊ, आई व वडील असा आप्त परिवार आहे.
विशेष म्हणजे, हे गाव केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे असून या गावातील भाजपचे आमदार रणधीर सावरकर हे अकोला पूर्वचे आमदार आहेत.

बाईट - सुरेंद्र नामदेव इंगळे,
मृतकाचे काका, पळसो बढे,
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.