अकोला - शहरातील बाळापूर परिसरातील अंजुमन मार्केटमध्ये सुरू असलेल्या ऑनलाईन मटका जुगारावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ६९ हजार ६२० रुपयांच्या मुद्देमालासह ११ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर बाळापूर पोलीस ठाण्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने बुधवारी ही कारवाई केली.
पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक हे बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. दरम्यान, त्यांना अंजुमन मार्केटच्या जवळील चारा बाजारात काही व्यक्ती हे कम्पुटरवर 'फन टार्गेट' या ऑनलाईन अॅपद्वारे जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. पथकाने या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत परमेश्वर रमेश वाघमारे, मोहम्मद मुस्ताक मोहम्मद एजाज, जावेद अहेमद शहा अहेमद, अब्दुल जाकीर अब्दुल मजिद, शंकर मधुकर घोंगे, विश्वास गणपत खाडे, स्वप्नील देवेन्द्र शिरसाठ, गोपाळ लक्ष्मण वानखडे, अब्दुल नबी अब्दुल रहेमान, शेख हनीफ शेख लाल, व्यवसाय मालक फिरोज सेठ यांच्याविरोधात विरूध्द पोलीस ठाणे बाळापूर येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तसेच त्यांच्याजवळून ६९ हजार ६२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा - स्थायी, समाज कल्याण समितीवरून अडले घोडे; सत्ताधाऱ्यांमध्ये चर्चेच्या फैरी
हेही वाचा - वृद्ध महिलेकडून 2 हजारांची लाच घेणाऱ्या खासगी व्यक्तीला एसीबीकडून अटक