ETV Bharat / state

महापालिकेच्या 2 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, सुरक्षा किट नसल्यामुळे कामगारांचा आंदोलनाचा इशारा - lack of safety kits in Akola

वेळोवेळी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे सुरक्षा किटची मागणी करुनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. कोरोना संसर्ग प्रतिबंध करण्यासाठी महापालिका सफाई कर्मचारी काम करत आहे. अनेक कर्मचाऱ्यांकडे हातमोजे आहेत. तर काही कर्मचारी रुमाल किंवा कापडी मास्क वापरून कर्तव्य बजावत आहेत.

Akola
अकोला
author img

By

Published : May 11, 2020, 5:48 PM IST

अकोला - महापालिका कर्मचारी तसेच सफाई कर्मचारी कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंध करण्यासाठी दिवस-रात्र काम करत आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचे सुरक्षा किट न दिल्यामुळे हे कर्मचारी जीव धोक्यात टाकून आपले कर्तव्य बजावीत आहेत. अकोल्यातील 2 सफाई कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सुरक्षा किट न दिल्यास उद्यापासून काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा मनपा सफाई कर्मचारी संघटनेने दिला आहे.

सुरक्षा किट नसल्यामुळे कामगारांचा आंदोलनाचा इशारा

वेळोवेळी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे सुरक्षा किटची मागणी करुनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी महापालिका सफाई कर्मचारी काम करत आहे. अनेक कर्मचाऱ्यांकडे हातमोजे आहेत. तर काही कर्मचारी रुमाल किंवा कापडी मास्क वापरून कर्तव्य बजावत आहेत. या कर्मचाऱ्यांकडे कुठल्याही प्रकारची सुरक्षा किट किंवा सॅनिटायझरही उपलब्ध नाहीत.

महापालिकेतील 2 सफाई कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सफाई कर्मचार्‍यांना सुरक्षा कीट देण्यात यावेत, असा न्यायालयाचा आदेश असतानाही मनपा प्रशासन या आदेशाचे उल्लंघन करत आहे, असा आरोप मनपा अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेस प्रदेश महामंत्री पी. बी. भातकुले यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.