ETV Bharat / state

अकोल्यात व्हीआरडीएल लॅब सुरू; पहिल्याच दिवशी घेतले २५ स्वॅब नमुने - vrdal lab akola

लॅबमध्ये अकोला, वाशिम, बुलढाण्यातील नमुने तपासण्यात येणार आहेत. या लॅबची दिवसाला ८० नमुने तपासण्याची क्षमता आहे. यामध्ये कोरोना, स्वाइन फ्लू इतर विषाणूजन्य आजारांचे निदान होणार आहे.

vrdal lab akola
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
author img

By

Published : Apr 13, 2020, 7:37 PM IST

अकोला- शहरात व्हीआरडीएल लॅब सुरू करण्यासाठी आयसीएमआरने अंतिम परवानगी दिली आहे. त्या पारश्वभूमीवर शहरात काल व्हीआरडीएल लॅब सुरू करण्यात आली आहे. लॅब सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी २५ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहे. त्याचे अहवाल ८ ते १० तासांमध्ये येणार असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे यांनी दिली.

प्रयोगशाळेची निर्मिती ही केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग योजना अंतर्गत येणाऱ्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा वैद्यकीय महाविद्यालय स्तरावर स्थापन करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रात ६ ठिकाणी ही प्रयोगशाळा उभारण्यात आली असून त्यामध्ये शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेचा समावेश आहे. राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे मार्फत घेण्यात आलेल्या गुणवत्ता चाचणीमध्ये अकोला जीएमसी पास झाल्याने प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी आयसीएमआरकडे अंतिम परवानगी मागण्यात आली होती. या लॅबमध्ये अकोला, वाशिम, बुलढाण्यातील नमुने तपासण्यात येणार आहेत. या लॅबची दिवसाला ८० नमुने तपासण्याची क्षमता आहे. यामध्ये कोरोना, स्वाइन फ्लू इतर विषाणूजन्य आजारांचे निदान होणार आहे.

प्रयोगशाळा उभारण्यासाठी पालकमंत्री बच्चू कडू, केंद्रीय राज्य मंत्री संजय धोत्रे यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी प्रशासकीय मार्गदर्शन केले. प्रयोगशाळा उभारण्यासाठी अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे, अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्यामकुमार सिरसाम, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश नैताम, सुक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. नितीन अंभोरे, आदींनी प्रयत्न केले आहे.

हेही वाचा- COVID-19 : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने ब्लेडने चिरला स्वतःचा गळा, उपचारादरम्यान मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.