ETV Bharat / state

Prakash Ambedkar demand file case on Raj Thackeray : राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा - ॲड. प्रकाश आंबेडकर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या सिल्वर ओक ( Silver Oak ) या घरावरील एसटी कर्मचाऱ्यांचा ( MSRTC Workers ) हल्ला पूर्व नियोजित होता. याबाबत गुप्तचर यंत्रणांनी हल्ल्याची पूर्व सूचना दिल्यानंतरही कायदा व सुव्यवस्था बघणारे मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील ( Vishwas Nagre Patil ) यांनी माहिती लपविली. त्यामुळे त्यांना निलंबित करून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

ॲड. प्रकाश आंबेडकर
ॲड. प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Apr 13, 2022, 4:55 PM IST

अकोला - धर्माचा प्रचार, प्रसार करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. त्यामुळे मंदिरावर भोंगे लागून हनुमान चालिसा लावल्यास कुणालाही आक्षेप नाही. मात्र, मशिदीपुढे भोंगे लागवून हनुमान चालिसा लावणे ही राज ठाकरे यांची भूमिका दंगली घडविणारी आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री याची तातडीने दखल घेत राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली ( Prakash Ambedkar demand file case on Raj Thackeray ) आहे. ते बुधवारी (दि. 13 एप्रिल) अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर

सिल्वर ओक प्रकरणी नागरे पाटील यांना निलंबित करा - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या सिल्वर ओक ( Silver Oak ) या घरावरील एसटी कर्मचाऱ्यांचा ( MSRTC Workers ) हल्ला पूर्व नियोजित होता. याबाबत गुप्तचर यंत्रणांनी हल्ल्याची पूर्व सूचना दिल्यानंतरही कायदा व सुव्यवस्था बघणारे मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी माहिती लपविली. त्यामुळे त्यांना निलंबित करून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

ते म्हणाले, घटनेच्या चार दिवस आधीच म्हणजे 4 एप्रिल, 2022 रोजी हल्ल्याबाबतची शक्यता वर्तविणारा सविस्तर अहवाल गुप्तचर यंत्रणांकडून सहपोलिस आयुक्तांना देण्यात आला होता. या अहवालात मुंबईतील मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा, आझाद मैदान, मंत्रालय, सह्याद्री अतिथीगृह, सिल्वर ओक, परिवहन मंत्री अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान व वांद्रे येथील खासगी निवासस्थान या ठिकाणी एसटी कर्मचारी आंदोलना करू शकतात, असे नमुद केले होते. हा अहवाल सहपोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांना पाठविण्यात आला होता. गुप्तचर विभागाचा अहवाल सकाळ, संध्याकाळ मुख्यमंत्र्यांना दिला जातो. त्यामुळे हल्ल्याच्या घटनेचा अहवाल गुप्तचर विभागाने दिला की नाही, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे, असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणेचा स्पष्ट अहवाल सहपोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांना मिळाल्यानंतरही त्यांनी योग्य कार्यवाही का केली नाही, असा प्रश्न करून ॲड. आंबेडकर यांनी उपस्थित करत नागरे पाटील यांना निलंबित करून चौकशी करण्याची मागणी केली आहे. ज्यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे, त्यांच्याकडेच या घटनेची चौकशी सोपविल्याने त्यांना तातडीने चौकशी समितीच्या प्रमुखपदावरून दूर करण्याची मागणी ॲड. आंबेडकर यांनी केली.

...तर सरकारमधून बाहेर पडून निवडणुका घ्या - सध्या देशातील अनेक राज्यांकडे अतिरीक्त वीज आहे. दुसरीकडे महाराष्ट्र तीन हजार 540 मेगावॅट वीज तुटवड्यामुळे भारनियमन करीत आहे. वास्तविक नॅशनल ग्रीडमुळे आता कुठल्याही राज्याची वीज क्षणात पोहोचू शकते. राज्य सरकारने गुजरात, उत्तरप्रदेश, तामीळनाडू, आंध्रप्रदेश अशा अतिरीक्त वीज उपलब्ध असलेल्या राज्यांसोबत चर्चा करून प्रश्‍न तातडीने सोडविण्याची गरज आहे. पण, हे तीन पायांचे सरकार असल्याने प्रश्‍न सोडवता येत नाही. राज्य चालवता येत नसेल तर सरकारमधून बाहेर पडून निवडणुका घ्या, अशी मागणीही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

युतीचे सर्व पर्याय खुले - काँग्रेस असो किंवा शिवसेना युतीसाठी आमचे पर्याय खुले असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट झाली, त्यावेळी त्यांनी युतीसंदर्भात चर्चा केली. मैत्री सर्वांनाच हवी आहे. मात्र, त्यापुढे जाण्याची कुणाची तयारी नसल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - Raj Thackeray : सभेत तलवार दाखवणे पडले महागात.. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.