अकोला - समोरुन येणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालक जखमी झाला असून ट्रकमध्ये असलेल्या अंगूरचे मोठे नुकसान झाले आहे. रिधोरा गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मंगळवारी पहाटे ही घटना घडली.
हेही वाचा - सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर बिबट्या जेरबंद; स्थानिकांचा सुटकेचा निश्वास
नाशिक येथून अंगुरच्या पेट्या घेऊन ट्रक कोलकोत्याकडे जात होता. राष्ट्रीय महामार्गावरील रिधोरा गावाजवळ पोहोचताच ट्रकचालकाने समोरुन येणाऱ्या ट्रकला व्होवरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चालकाने ब्रेक लावला. मात्र, मागील चाकाचा ब्रेक जाम झाल्याने ट्रक उलटला. या घटनेत चालक निपुण राय हा जखमी झाला असून क्लिनर सोपान मंडल (रा. पश्चिम बंगाल) जखमी झाला आहे. या अपघातात ट्रकसह ट्रकमधील अंगुरचे मिळून अंदाजे 15 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेचा पुढील तपास बाळापूर पोलीस करत आहे.