ETV Bharat / state

अकोल्यात उभ्या बसला ट्रकची धडक; ४ जण जखमी

author img

By

Published : Aug 26, 2019, 12:00 AM IST

औरंगाबादवरून नागपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बस क्र (एमएच- २०, डीडी- ०७७०) या बसचा राजस्थानी धाब्यानजीक समोरचा टायर पंक्चर झाला होता. त्यामुळे बस रोडवर उभी होती. यावेळी बस चालक व्यंकटेश मनोहर पतंगे हा पंक्चर जॅक लावून टायर काढत होता. त्या दरम्यान नागपूरला जाणारा आयशर ट्रक क्र.(युपी- ७८, एफऐन- ०६७९) च्या चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपने चालवून उभ्या पंक्चर बसला जबर धडक दिली. यात आयशर ट्रकचे दोन चालक गंभीर तर एक चालक किरकोळ जखमी झाला.

अकोल्यात उभ्या बसवर धडकला ट्रक

अकोला - नादुरुस्त खासगी प्रवासी बसला आयशर ट्रकने मागून जबर धडक दिली. त्यामुळे या अपघातात दोन जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर कुरूम जवळील राजस्थानी धाब्याजवळ घडली. गंभीर जखमीमध्ये आयशर ट्रकच्या दोन तर किरकोळ जखमीमध्ये ट्रॅव्हल बसच्या आणि ट्रकच्या प्रत्येकी एका चालकाचा समावेश आहे.

औरंगाबादवरून नागपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बस क्र.(एमएच- २०, डीडी- ०७७०) या बसचा राजस्थानी धाब्यानजीक समोरचा टायर पंक्चर झाला होता. त्यामुळे बस रोडवर उभी होती. यावेळी बस चालक व्यंकटेश मनोहर पतंगे हा पंक्चर जॅक लावून टायर काढत होता. त्या दरम्यान नागपूरला जाणारा आयशर ट्रक क्र.(युपी- ७८, एफऐन- ०६७९) च्या चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपने चालवून उभ्या पंक्चर बसला जबर धडक दिली. यात आयशर ट्रकचे दोन चालक गंभीर तर एक चालक किरकोळ जखमी झाला. तर ट्रॅव्हल्स बसचा चालक व्यंकटेश मनोहर पतंगे हा जॅक बसविताना टायर घासल्याने जखमी झाला.

सुदैवाने बस पंक्चर असल्यामुळे सर्व प्रवाशी खाली उतरले होते. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच माना पोलीस व कुरूम चौकीचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आयशर ट्रकच्या कॅबिनमध्ये फसलेल्या तीन पैकी दोन गंभीर जखमी चालकांना पोलिसांनी काढले. त्यानंतर रुग्णवाहिकेने त्यांना अकोला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

तर किरकोळ जखमी एका चालकाला व ट्रॅव्हल्स बसच्या चालकाला रुग्णवाहिकेने अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले. या अपघातात आयशर ट्रकच्या कॅबिनचे व बसच्या मागच्या बाजूला मोठे नुकसान झाले आहे. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल व्हायचा होता. आयशर ट्रकमधील गंभीर व किरकोळ जखमी चालकाचे नाव अद्याप कळू शकले नाही.

Intro:अकोला - नादुरुस्त खासगी प्रवासी बसला आयशर ट्रकने मागून जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर कुरूमजवळच्या राजस्थानी धाब्याजवळ रविवारी घडली. गंभीर जखमीमध्ये आयशर ट्रकच्या दोन तर किरकोळ जखमीमध्ये ट्रॅव्हल बसच्या व ट्रकच्या प्रत्येकी एका चालकाचा समावेश आहे.Body:औरंगाबादवरून नागपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बस क्र. एमएच - २० डीडी - ०७७० या बसचा राजस्थानी धाब्यानजीक समोरचा टायर पंचर झाल्याने रोडवर उभ्या स्थितीत होती. यावेळी बस चालक व्यंकटेश मनोहर पतंगे हा पंचर जॅक लावून टायर काढतांना नागपूरला जाणारा आयशर ट्रक क्र. युपी - ७८ एफऐन - ०६७९ च्या चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपने  चालवून उभ्या पंचर ट्रॅव्हल बसला जबर धडक दिली. यात आयशर ट्रकचे दोन चालक गंभीर तर एक चालक किरकोळ जखमी झाला. तर पंचर ट्रॅव्हल्स बसचा चालक व्यंकटेश मनोहर पतंगे हा जॅक बसवितांना टायर घासल्याने जखमी झाला. सुदैवाने बस पंचर असल्यामुळे सर्व प्रवाशी खाली उतरले होते. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच माना पोलीस व कुरूम चौकीचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आयशर ट्रकच्या कॅबिन मध्ये फसलेल्या तीन पैकी दोन गंभीर जखमी चालकांना पोलिसांनी काढून रुग्णवाहिकेने अकोला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले. तर किरकोळ जखमी एका चालकाला व ट्रॅव्हल्स बसच्या चालकाला रुग्णवाहिकेने अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले. या अपघातात आयशर ट्रकच्या कॅबिनचे व बसच्या मागच्या बाजूला मोठे नुकसान झाले आहे. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल व्हायचा होता. आयशर ट्रकमधील गंभीर व किरकोळ जखमी चालकाचे नाव अद्याप कळू शकले नाही.  Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.