अकोला - बाळापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर गुरुवारी (१८ एप्रिल) रात्री धान्याच्या ट्रकला आग लागली होती. डिझेलची टाकी फुटल्याने ही आग लागली. आग लागल्यानंतर चालक बलराज प्रजापती यांनी ट्रकमधून उडी घेऊन आपला जीव वाचवला. ही आग विझल्यानंतर त्यातील उरलेले धान्य परिसरातील नागरिकांनी जमा करून घरी नेले. दरम्यान, आग विझवण्यासाठी बाळापूर अग्निशमन दलाची गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी आल्याचे समजते.
ही आग विझवण्यासाठी परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले. तरीही, आग रात्रभर धुमसत होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ एप्रिलला पहाटे आग विझवण्यासाठी बाळापूर अग्निशमन दलाची गाडी आली होती. मात्र, तोपर्यंत आग विझलेली होती. या ट्रकमध्ये धान्याचे पोते होते. आगीमुळे ट्रकमधील धान्य खाली सांडले. जळालेले धान्य ट्रकमध्ये होते. मात्र, खाली सांडलेले धान्य परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या कपड्यात जमा करून घरी नेले.