अकोला - दिवसेंदिवस अकोल्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. आज (सोमवार) आणखी कोरोनाचे 5 रुग्ण सापडले आहेत. तर एका कोरोना रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, अकोल्यात कोरोना रुग्णांची संख्या ही 159 वर पोहोचली आहे.
अकोल्यात सध्या 131 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 14 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच 13 जणांचा मृत्यू झाला असून, एकाने आत्महत्या केली आहे. मृतांची संख्या 14 वर गेली आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात एक 26 वर्षीय युवक आंबेडकर नगर सिव्हिल लाईन्स, एक 56 वर्षीय महिला आगरवेस जुने शहर व एक 40 वर्षीय इसम अकोट फ़ैल या भागातील रहिवासी आहे. एका 65 वर्षीय रुग्णाचा उपचार घेताना मृत्यू झाला. हा रुग्ण शनिवार 2 मे रोजी दाखल झाला होता. तो बैदपुरा येथील रहिवासी होता. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात एक 55 वर्षीय असून तो मोठी उमरी भागातील रहिवासी आहे. तर अन्य एक 11 वर्षीय मुलगा असून तो किल्ला चौक जुने शहर या भागातील रहिवासी आहे.
एकूण पॉझिटिव्ह अहवाल - 159
मृत- 14 (13 + 1),
डिस्चार्ज - 14
दाखल रुग्ण (पॉझिटिव्ह) - 131