अकोला - अकोलामध्ये आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमधून 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण 48 जणांचे अहवाल आज तपासण्यात आले होते. जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 627 झाली आहे. त्यापैकी 151 अॅक्टिव रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, सोमवारी (दि. 1 जून) 24 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.
प्राप्त अहवालात 12 महिला व 10 पुरुषांचा समावेश आहे. दोन महिला रुग्ण या जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित आहेत. हे रुग्ण रजपुतपुरा येथील 3, सिंधी कॅम्प येथील 2, माळीपुरा येथील 2, अशोकनगर अकोट फैल येथील 2 तर उर्वरीत तारफैल, सिटी कोतवाली, जठारपेठ, आंबेडकरनगर, शिवसेना वसाहत, जुने तारफैल, आदर्श कॉलनी, गुलशन कॉलनी, रुद्रनगर, जुनी उमरी नाका, खदान, पुरानी मशिद आणि अलिम चौक खदान येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
- आजची प्राप्त आकडेवारी
प्राप्त अहवाल - 48
पॉझिटीव्ह - 22
निगेटीव्ह -26
- आज (दि. 2जून) सकाळपर्यंतची आकडेवारी
एकूण पॉझिटिव्ह अहवाल - 627
मृत- 34
बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 442
उपचार घेत असलेले रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह) - 151