अकोला - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येसोबतच मृतांचा आकडादेखील वाढत आहे. आज आणखी तीन नव्या रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर, एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्राप्त अहवालातील 3 रुग्ण पुरुष असून ते शिवसेना वसाहत, तार फ़ैल व शिवाजीनगर येथील रहिवासी आहेत.
आज मृत्यू झालेला कोरोनाबाधित रुग्ण 58 वर्षीय पुरुष असून तो 12 जून रोजी रुग्णालयात दाखल झाला होता. 13 जून रोजी या रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर आज या व्यक्तीचा अहवाल प्राप्त झाला असून तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. संबंधित रुग्ण शिवाजीनगर येथील रहिवासी होता.
* सोमवारी प्राप्त अहवाल-७७
*पॉझिटिव्ह - तीन
*निगेटिव्ह - ७४
*सद्यस्थितीतील एकूण पॉझिटिव्ह अहवाल - १०१०
*मृत -५२
*डिस्चार्ज - ६३७
*ॲक्टिव्ह रुग्ण -३२१