ETV Bharat / state

वेतन निश्चितीसाठी शिक्षकांकडून पैसे मागितल्याचे प्रकरण, हजार शिक्षकांचे नोंदवले लेखी जबाब

शिक्षकांच्या वेतन निश्चितीच्या प्रक्रियेसाठी पैशांची मागणी केल्याप्रकरणी शनिवारी जिल्हा परिषदेमधील १ हजार ५० शिक्षकांचे लेखी जबाब नोंदविण्यात आले. विशेष म्हणजे, ५ ही पंचायत समितीच्या शिक्षकांना यासंदर्भात प्रशासनातर्फे नोटीस बजावण्यात आली होती.

author img

By

Published : May 4, 2019, 11:40 PM IST

हजार शिक्षकांचे नोंदवले लेखी जबाब

अकोला - शिक्षकांच्या वेतन निश्चितीच्या प्रक्रियेसाठी पैशांची मागणी केल्याप्रकरणी शनिवारी जिल्हा परिषदेमधील १ हजार ५० शिक्षकांचे लेखी जबाब नोंदविण्यात आले. विशेष म्हणजे, ५ ही पंचायत समितीच्या शिक्षकांना यासंदर्भात प्रशासनातर्फे नोटीस बजावण्यात आली होती. नोटीसमध्ये नियमित वेतन देयक तयार करण्याबाबत सुनावणीस उपस्थित राहण्याचे नमूद करण्यात आले होते. परतु, प्रत्यक्षात मात्र, सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चिती प्रकरणी पैसे दिल्याबाबत जबाब नोंदविण्यात आले. त्यामुळे शिक्षण विभागाच्या या अजब कारभारामुळे शिक्षक गोंधळून गेले. या प्रकरणामध्ये यापूर्वीच कनिष्ठ सहाय्यक यांना निलंबित करण्यात आले आहे.

शासनाने लागू केलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या निश्चितीवरून शिक्षकांकडून पैसे उकळण्यात येत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला होता. त्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि इतर अधिकाऱ्यांनी यासंदर्भात खासगी संगणक सेंटरवर धाव घेतली. या प्रकरणाची चौकशी करत त्यांनी दोषी ५ कनिष्ठ सहाय्यकांना निलंबित केले आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शिक्षकांकडून याबाबतचे जबाब नोंदविण्याचे आदेश जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार शिक्षण विभागाने जिल्ह्यातील जवळपास दीड हजार शिक्षकांना नोटीस बजावली. या नोटीसनंतर जबाब नोंदविण्यासाठी आलेल्या शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आपला लेखी जबाब नोंदवला. या शिक्षकांपैकी काही शिक्षकांनी जबाब नोंदविण्यास नकार दिला. तर काहींनी शिक्षण विभागाने दिलेल्या प्रश्नावलीनुसार जबाब नोंदविला नसल्याचे समजते. दरम्यान, शिक्षकांकडून पैसे घेण्याचे हे प्रकरण जिल्हा परिषदेमध्ये चांगलेच गाजत आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:अकाेला - शिक्षकांच्या वेतन निश्चितीच्या प्रक्रियेसाठी पैशाची मागणी केल्याप्रकरणी शनिवारी एक हजार 50 शिक्षकांचे लेखी जबाब नोंदविण्यात आले. अकाेला, मूर्तिजापूर, बाळापूर, बार्शिटाकळी पंचायत समितीअंतर्गत शिक्षकांना नाेटीस बाजवण्यात अाली हाेती. नाेटीसमध्ये नियमित वेतन देयक तयार करण्याबाबत सुनावणीस उपस्थित राहण्याचे नमूद करण्यात अाले. मात्र प्रत्यक्षात जबाब सातव्या वेतन अायाेगाच्या वेतन निश्चितीप्रकरणी पैसे दिल्याबाबत नाेंदवण्यात अाला. शिक्षण विभागाच्या अजब कारभाराने शिक्षकही गाेंधळून गेले हाेते. यामध्ये आधीच कनिष्ठ सहाय्यकाना निलंबित करण्यात आलेले आहे.Body:शासनाने लागू केलेल्या सातव्या वेतन अायाेगाच्या निश्चितीवरुनही शिक्षकांकडून पैसे उकळण्यात येत असल्याचा अाराेप झाला. वेतनचा हीशाेब जुळवण्यासाठी संगणक - प्रिंटरचे कारण देऊन शिक्षकांकडे 350 रुपयांची मागणी करण्यात आली. याप्रकरणी चाैकशीला प्रारंभ करण्यात अाला. शुक्रवारी ३२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे जबाब नाेंदवण्यात अाले. शनिवारी संबंधीत शीक्षकांकडून लेखी मािहती घेण्यात अाली. ही प्रक्रिया जी. प.मध्ये पार पडली. यावेळी शिक्षणाधिकारी वैशाली ठग, अकाेला पं.सं.चे गटविकास अधिकार राहुल शेळके प्रामुख्याने उपस्थित हाेते.
अकाेला तालुक्यातील एका शाळेच्या शिक्षकांचे देयक वेतन निश्चितीप्रकरणी पैशांची मागणी करण्यात अाली. एका शीक्षकाने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याची स्पिल परत पाठवण्यात अाली. त्यामुळे शिक्षकाने केलेल्या प्राथमिक पडताळणीनंतर ही बाब उजेडात अाल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. त्यानंतर जील्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी एका खासगी संगणक सेंटरवर धाव घेतल्यानंतर शिक्षकांच्या वेतनाबाबतची मािहती तेथे असल्याचे दिसून अाले. त्यानंतर चाैकशीला प्रारंभ झाला हाेता.Conclusion:सूचना - सोबत व्हिडिओ आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.