अकोला - कोरोना रुग्णांची संख्या आज (रविवारी) सकाळी आलेल्या अहवालानुसार 38 ने वाढली आहे. तर एका 85 वर्षे रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अकोल्यातील दिवसेंदिवस वाढणारे रुग्णांची संख्या ही चिंतेची बाब झाली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा प्रशासन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊनही रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत नाही.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात 18 महिला व 20 पुरुष आहेत. त्यातील आठ जण खदान येथील, चार जण अकोट फैल, चार जण तार फैल, चार जण खडकी, चार जण जिएमसी क्वार्टर येथील तर उर्वरित रुग्ण रजपुतपुरा, अंतरी मलकापूर, हरिहरपेठ, वाशीम रोड, छोटी उमरी नाका, द्वारका नगर मोठी उमरी, गजानन नगर, बापूनगर टेलिफोन कॉलनी, कैलास टेकडी, नायगाव येथील आहेत.
दरम्यान, 6 जून रात्री एका 85 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण रजपुतपुरा येथील रहिवासी असून, 31 मे रोजी त्यास दाखल केले होते. या रुग्णाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णाचा समावेश आजच्या अहवालात करण्यात आला आहे.
प्राप्त अहवाल-138
पॉझिटिव्ह-38
निगेटिव्ह-100
आता सद्यस्थिती -
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-794
मृत-37(36+1)
डिस्चार्ज-531
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह) - 226