ETV Bharat / state

अकोल्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत 30ने वाढ; संख्या 465वर - corona virus update akola

पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये 10 महिला तर 20 पुरुष रुग्ण आहेत. त्यातील 13 जण हे हरिहर पेठ येथील रहिवासी आहेत.

Akola corona update
अकोला कोरोना अपडेट
author img

By

Published : May 27, 2020, 3:57 PM IST

अकोला - जिल्हा प्रशासनाला आज सकाळी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालामध्ये 30 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अकोला जिल्हा प्रशासनाने 183 अहवाल तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 153 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 465वर पोहोचली आहे. रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने ही संख्या केव्हा कमी होणार, अशी चिंता शहरवासीयांना लागली आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये 10 महिला तर 20 पुरुष रुग्ण आहेत. त्यातील 13 जण हे हरिहर पेठ येथील रहिवासी आहेत. मोहता मिल प्लॉट नाजुकनगर, मोठी उमरी, गुलजार पुरा येथील प्रत्येकी दोन जण, खैर मोहम्मद प्लॉट, राहुलनगर शिवनी, तेलीपुरा, लेबर कॉलनी तारफैल, सहकार नगर, डाबकी रोड, वृंदावन नगर, देशमुख फैल, चांदखा प्लॉट वाशिम बायपास, फिरदौस कॉलनी, रणपिसे नगर येथील प्रत्येकी एक जण रहिवासी कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात 30 रुग्ण आढळून आल्याने सायंकाळी येणाऱ्या अहवालामध्ये ही संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अकोलेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, प्रशासन या कोरोना प्रसाराच्या साखळीत खंड पाडण्यात अपयशी ठरल्याची चर्चा आहे.

प्राप्त अहवाल - १८३
पॉझिटिव्ह - ३०
निगेटिव्ह - १५३

आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल - ४६५
मृत - २८ (२७+१),
डिस्चार्ज - २८९
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह) - १४८

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.