ETV Bharat / state

अकोल्यातील 'त्या' ३ रुग्णांचा चौथा अहवालही पॉझिटिव्ह; पातुरातील ७ रुग्णांना डिस्चार्ज - अकोला संचारबंदी

जे तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. या तिघांचाही चौथा तपासणी अहवाल हा परत पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

third report of corona came positive in akola while seven patient discharged

author img

By

Published : Apr 23, 2020, 4:52 PM IST

Updated : Apr 23, 2020, 5:51 PM IST

अकोला - कोरोना संसर्ग असलेल्यांपैकी तिघांचा चौथा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर पातूरच्या ७ जणांना आज सुटी देण्यात आली आहे. सुटी दिलेल्या रुग्णांना 14 दिवस होम क्वारंटाईन राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज दिली.

पातूर येथील ७ जण हे वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथील दिल्ली येथून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आले होते. त्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले होते. या सातही जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती चांगली झाल्यामुळे त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सुटी देण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, त्यांच्यावर उपचार करणारे अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हाधिकारी, महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी टाळ्या वाजवून त्यांना निरोप दिला.

रुग्णवाहिकेतून या सातही जणांना त्यांच्या गावी परत पाठविण्यात आले आहे. त्यासोबतच चिंतेची बाब म्हणजे, जे तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. या तिघांचाही चौथा तपासणी अहवाल हा परत पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णांमध्ये एक साडेतीन वर्षांचा मुलगा, 14 वर्षांचा मुलगा व 17 वर्षांची मुलगी आहे. हे तिघेही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आहेत.

Last Updated : Apr 23, 2020, 5:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.