ETV Bharat / state

आनंदवार्ता..! मलेरिया रुग्णांच्या संख्येत होतेय घट - अकोला मलेरिया रुग्णसंख्या

सध्या कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आरोग्य यंत्रणांवर ताण वाढला आहे. मात्र, अशा परिस्थितीतही अकोला आरोग्य विभागासाठी एक आनंदाची बाब आहे. जिल्ह्यातील मलेरिया रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.

Malaria
मलेरिया
author img

By

Published : Sep 24, 2020, 2:28 PM IST

अकोला - कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ ही चिंताजनक बाब आहे. मात्र, अकोला आरोग्य विभागासाठी या काळातही एक दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यातील मलेरिया रुग्णांच्या संख्येतील कमालीची घट झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या नऊ वर्षात एकही रुग्ण मलेरियामुळे दगावला नसल्याची माहिती मलेरिया विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आदित्य महाणे यांनी दिली.

मलेरिया रुग्णांच्या संख्येत होतेय घट

मलेरिया रोखण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळेच मलेरिया रुग्णांची संख्या दरवर्षी कमी होताना दिसत आहे. 2017 मध्ये जानेवारी ते डिसेंबर या काळात मलेरिया रुग्णांची संख्या 53 होती. ती 2018मध्ये 36वर, तर 2019 मध्ये 11वर आली. ऑगस्ट 2020 पर्यंत ही संख्या फक्त आठ आहे.

मलेरियाचे लक्षणे -

मलेरिया रुग्णाला दिवसाआड ताप येतो, त्यांना थंडी वाजते, अशक्तपणा वाटतो, डोके दुखी वाढते.

कसा पसरतो मलेरिया -

मलेरिया प्लॅस्मोडियम वीवेक्स या विषाणूपासून होतो. अनोफिलीस मादी डास चावल्याने व्यक्तीच्या रक्तामध्ये हा विषाणू प्रवेश करतो. हा डास एका व्यक्तीला चावल्यानंतर तो लगेच दुसऱ्या व्यक्तीला चावतो. अशा प्रकारे मलेरियाचे संक्रमण होते. मलेरियामुळे व्यक्तीच्या यकृतावर परिणाम होतो. हे रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरू शकते, अशी माहिती मलेरिया विभागाचे जिल्हा अधिकारी डॉ. आदित्य महाणे यांनी दिली.

काय काळजी घ्यायला हवी -

घराभोवती साचलेले पाणी व तुंबलेल्या नाल्या वाहत्या करणे, साचलेल्या पाण्यामध्ये तेल, वंगण, गाडीचे जळालेले ऑइल इत्यादी टाकावे, घरातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी शोषखड्ड्यांचा वापर करावा, घरातील पाण्याची भांडी हौद, ड्रम, माठ इत्यादी आठवड्यातून एक दिवस घासून ते कोरडे करावे, घरातील निरुपयोगी वस्तू जसे फुटलेले रांजण, निकामी टायर, नारळाच्या करवंट्या, फुलदाण्या आदीमध्ये पाणी साचू देवू नये. असे केल्यास मच्छर तयार होण्यास आपण रोखू शकतो.

ग्रामीण भागात आरोग्य सेविका व आशा करत आहेत सर्व्हे -

ग्रामीण भागामध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविका घरांचा सर्वे करतात. घरातील भांडी, सांडपाण्याचा निचरा होणारे ठिकाण, ठेवणीतल्या ठिकाणांची पाहणी करून तिथे स्वच्छता ठेवण्याच्या सूचना या सेविका संबंधित महिला व व्यक्तींना करतात. ज्या ठिकाणी रुग्ण आढळला त्या व्यक्तीच्या नावाची नोंद घेऊन तेथे औषध पुरवठा केला जातो. आरोग्य विभागाच्या पथकाला पाचारण करून पूर्ण परिसराची तपासणी करण्यात येतो. ग्रामपंचायतकडून औषध फवारणीही करण्यात येते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.