ETV Bharat / state

मांजामुळे वाहनचालक जखमी - अकोला लेटेस्ट न्यूज

दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीचा मांजामुळे गळा कापल्याची घटना अकोल्यात घडली आहे. संजय राठोड असे या व्यक्तीचे नाव असून, दुचाकीवरून जात असताना पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्याभोवती आवळला गेला, या घटनेत त्यांचा गळा कापला असून, हाताला देखील इजा झाली आहे, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

मांजामुळे वाहनचालक जखमी
मांजामुळे वाहनचालक जखमी
author img

By

Published : Jan 15, 2021, 10:24 PM IST

अकोला - दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीचा मांजामुळे गळा कापल्याची घटना अकोल्यात घडली आहे. संजय राठोड असे या व्यक्तीचे नाव असून, दुचाकीवरून जात असताना पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्याभोवती आवळला गेला, या घटनेत त्यांचा गळा कापला असून, हाताला देखील इजा झाली आहे, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

मांजामुळे दोन दिवसांमध्ये तीन जण जखमी

दरम्यान चायना मांजामुळे मकरसंक्रांतीच्या दिवशी शंतनू काशीद यांच्या गळ्याला इजा होऊन ते गंभीर जखमी झाले होते. तर दुसऱ्या एका घटनेत मांजामुळे एका महिलेचा पाय कापला गेला, तर आज संजय राठोड हे मांजामुळे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. संक्रांतीनिमित्त मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जातात, मात्र पतंग कटल्यानंतर त्याचा मांजा रस्त्यावर पडतो, अशा मांजामुळे अनेक अपघाताच्या घटना घडत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.