अकोला: रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या दीपक चौकातील अल्फा कॉर्नर या इमारतीत एक टायपिंग क्लास आहे. या ठिकाणी शिकण्यासाठी येणाऱ्या एका विद्यार्थ्यावर चाकू हल्ला झाला आहे. अज्ञाताने विद्यार्थ्यावर हल्ला करून पळ काढला. याप्रकरणी रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये अलीकडच्या काळात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे.
पातुर येथील उद्देश संतोष मानकर असे जखमी विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो दीपक चौकातील अल्फा कॉर्नर या इमारतीमध्ये कम्प्युटर आणि टायपिंग क्लास मधे शिकत होता. नेहमीप्रमाणे तो दुपारी क्लासला आला. त्या ठिकाणी अचानक आलेल्या काही युवकांनी त्याच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. या प्रकारात तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर क्लास मधिस विद्यार्थी व परिसरातील नागरिकांनी त्याला तत्काळ उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले.
घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच गुन्हा ही दाखल केला आहे. हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणासाठी झाला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास पोलीस निरीक्षक किशोर शेळके हे करत आहेत. दरम्यान, उद्देश मानकर हा क्लासच्या जवळ असताना त्या ठिकाणी आलेल्या युवकांनी त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. मांडीवर आणि पायावर हे वार करण्यात आले असल्यामुळे पायातून रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होता.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उद्देश मानकर याच्यावर झालेल्या हल्यानंतर पोलिसांनी संबंधित हल्लेखोराचा तपास सुरु केला आहे. मात्र हल्लेखोर किंवा त्या सोबतच्या इतर युवकांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची शहरात पथके रवाना केली आहेत. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती रामदास पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनी दिली.
उद्देश मानकर या विद्यार्थ्यावरील हल्ला प्रकरणात सोहेल उर्फ कालू याच्यावर संशय आहे. या प्रकरणात त्याचेच नाव समोर येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचा शोध घेण्यात येत आहे. हा हल्लेखोर व्यसनाधीन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांकडून युद्ध स्तरावर तपास सुरू आहे. दरम्यान, जखमी मानकरवर सर्वोच्च रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणात त्याच्या जवाबा नंतर घटने मागील सत्य समोर येईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : Thane crime : फार्म हाऊसमध्ये माय लेकीवर जीवघेणा हल्ला; हल्ल्यात आईचा मृत्यू, मुलगी गंभीर