अकोला - अकोल्यात कोरोना रुग्णांची संख्या कमालीची वाढत आहे. गुरुवारी 13 तर आज 10 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये सहा महिला असून एक 12 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. तर यापैकी आठ रुग्ण हे एकाच परिसरातील आहेत.
सुरुवातीला बैदपुरा या भागातून निघालेला पहिल्या रुग्णानंतर येथे आरोग्य पथकाने नागरिकांची आरोग्य तपासणी केली. आता या परिसरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नव्याने सापडलेल्या कोरोनाबाधितांमध्ये आठ जण हे बैदपुरा येथील रहिवासी आहेत. तर एक भगतसिंह चौक माळीपुरा व अन्य एक जुने शहर येथील रहिवासी आहे. सापडलेल्या रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे एकूण १०५ पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यातील ८० रु्ग्ण अॅक्टिव केसेस आहेत, तर ११ जणांचा मत्यू झाला आहे. १४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.