अकोला - घरातून रांगत-रांगत नालीत पडलेल्या दहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. ही घटना अकोल्यापासून जवळ असलेल्या यावलखेड येथे घडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. आतिष आगरकर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
चिमुकला रांगत-रांगत केव्हा घराबाहेर गेला
आई व आजी काम करीत होत्या. तर, वडील बाहेर गेले होते. चिमुकला घरात आहे, हे सर्वांच्या लक्षात होते. परंतु, हा चिमुकला रांगत-रांगत केव्हा घराबाहेर गेला, हे कोणालाच माहित नाही. तो बाहेर आल्यानंतर घरासमोर असलेल्या मोठ्या नालीत पडला. त्याला रडण्याचा आवाज आला नाही. दरम्यान, बाळ घरात नाही म्हणून सर्वत्र शोध घेण्यात आला. तर, चिमुकला नालीत पडलेला दिसला. त्यावेळी त्याच्या आईने एकच हंबरडा फोडला.
'यामध्ये संशय घेण्यासारखे काही नाही'
या घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील सोळंके यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. या प्रकरणी पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. चिमुकल्याचा नालीत पडून मृत्यू झाला आहे. यामध्ये संशय घेण्यासारखे काहीच नाही. चिमुकल्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील सोळंके यांनी दिली.
हेही वाचा - भिवंडीत इमारत कोसळली; एकाचा मृत्यू तर 9 जखमी