ETV Bharat / state

अकोल्याचा पारा ४१ अंशावर. . वाढत्या तापमानाने नागरिक हैराण - तापमान

अकोल्याचा पार आज ४१.४ अंशावर पारा गेला आहे. गेल्या आठवड्याभरापासून अकोल्याचे तापमान ३७ ते ४० अंशावर राहिले आहे.

आग ओकणारा सूर्य
author img

By

Published : Mar 26, 2019, 2:00 PM IST

अकोला - राज्यात लोकसभा निवडणुकीचा जोर चढत चालला असतानाच उन्हाचा पाराही वाढत आहे. अकोल्याचा पार आज ४१.४ अंशावर पारा गेला आहे. गेल्या आठवड्याभरापासून अकोल्याचे तापमान ३७ ते ४० अंशावर राहिले आहे. मार्च महिना संपत नाही, तोच उन्हाचा कडाका अकोलेकरांना जाणवत असून रस्ते निर्मणुष्य होत आहेत. वाहन चालकांच्या डोक्यावर टोपी आणि पांढरे दुपट्टे तसेच डोळ्यावर काळा चष्मा दिसून येत आहे.

तापमान वाढले

यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अकोल्याचे तापमान ३६ अंशावर आले होते. त्यानंतर तापमानात चढ-उतार जाणवत होता. गेल्या आठवडाभरापासून अकोल्याचे तापमान ३७ ते ४० अंशावर राहत होते. परंतु, आजच्या तापमानाने मार्च महिन्यातील उच्चांकी गाठल्याचे समजते. आजचे ऊन कडक आणि शरीराला चटके देणारे होते. या कडक उन्हात पाण्यासाठीही नागरिकांची फरपट सुरू होती.

अशा रखरखत्या उन्हात जनजीवन विस्कळीत झालेले नव्हते. परंतु, मुख्य रस्त्यावर वाहतूक नेहमीपेक्षा कमी दिसून आली. तसेच पादचारीही ऑटोचा उपयोग करताना दिसून आले. दरम्यान, एप्रिल व मे महिना लागण्याआधीच अकोल्याचा पारा ४१ अंशांवर गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा पारा एप्रिल महिन्यात ४७ किंवा ४८ अंशावर जाण्याची शक्यता नागरिकांमधून वर्तविण्यात येत आहे. नागरिकांची रसवंती, शरबत या दुकानांवर मोठी गर्दी होत आहे.

Intro:अकोला - जसजसा लोकसभा निवडणुकीचा जोर चढत आहे तसं उन्हाचा पारा ही वाढत आहे. आज 41.4 अंशावर उन्हाचा पारा गेला. गेल्या आठवड्याभरापासून अकोल्याचे तापमान 37 ते चाळीस अंशावर राहिले. मार्च महिना संपत नाही तोच उन्हाचा कडाका अकोलेकरांना जाणवत असून रस्ते निर्मनुष्य होत आहे. वाहन चालकांच्या डोक्यावर टोपी आणि पांढरे दुपट्टे तसेच डोळ्यावर काळा चष्मा दिसून येत आहेत.

Body:यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अकोल्याचे तापमान 36 अंश यावर आले होते. त्यानंतर तापमानात चढ उतार जाणवत होता. गेल्या आठवडाभरापासून अकोल्याचे तापमान 37 ते 40 अंशावर राहत होते. परंतु, आजच्या तापमानाने मार्च महिन्यातील उच्चांकी गाठली असल्याचे समजते. 41.4 अंश तापमान होते. आजचे ऊन खडक आणि शरीराला चटके देणारी होते. या कडक उन्हात पाण्यासाठी ही नागरिकांची फरपट सुरू होती. तसेच वाहन चालकांनी डोक्यावर टोपी आणि दुपट्टा बांधून वापरला तर डोळ्यावर काळा चष्मा लावलेले होते. अशा रखरखत्या उन्हात जनजीवन विस्कळीत झालेले नव्हते. परंतु, मुख्य रस्त्यावर वाहतूक नेहमीपेक्षा कमी दिसून आली. तसेच पादचारीही ऑटो चा उपयोग करताना दिसून आले. दरम्यान, एप्रिल व मे महिना लागण्याआधीच अकोल्याचा पारा 41 अंशांवर गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा पारा मागील वर्षी 46 अंशावरून 47 किंवा 48 अंशावर एप्रिल महिन्यात जाण्याची शक्यता नागरिकांमधून वर्तविण्यात येत आहे. नागरिकांची रसवंती शरबत या दुकानांवर मोठी गर्दी होती.

Conclusion:सूचना - सोबत व्हिडीओ पाठवीत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.