ETV Bharat / state

Highest Rainfall In Telhara : तेल्हारा तालुक्यात एकाच रात्री सर्वांत जास्त पाऊस; ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत - पूरजन्य परिस्थिती

अकोला जिल्ह्यामध्ये काल रात्रभरापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तेल्हारा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने अनेक नागरिकांच्या घरात पाणी गेले आहे. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ते बंद पडलेले आहेत.

Highest Rainfall In Telhara
अकोला जिल्ह्यातील पावसाची स्थिती
author img

By

Published : Jul 22, 2023, 5:57 PM IST

अकोला जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच

अकोला : तेल्हारा तालुक्यामध्ये जवळपास 146.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक रस्त्यांवरील वाहतूक बंद पडलेली आहे. हिवरखेड रस्ता हा बंद झालेला आहे. प्रशासनाकडून या ठिकाणी मदतकार्य करण्यासाठी संबंधित यंत्रणेला तयार ठेवण्यात आलेले आहे. जिल्ह्यामध्ये 139.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

रस्त्यांवरील वाहतूक खोळंबली : अकोला जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून पडत असलेल्या पावसाने अनेक नदी-नाल्यांना पूर आलेला आहे. तर काही मार्गांवरील रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक बंद झालेली आहे. अकोला तालुक्यामध्ये रात्रीपासून तर आतापर्यंत पडलेला पाऊस 25.4 मिलिमीटर आहे. तर बोर्ना नदीच्या पुरामुळे आगरउभा रस्ता बंद झालेला आहे. त्यासोबतच बार्शीटाकळी तालुक्यात जवळपास 29.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या तालुक्यात कुठल्याही प्रकारची वाहतूक बंद झालेली नाही. तर अकोट तालुक्यामध्ये जवळपास 34.8 मिलिमीटर पाऊस पडला आहे. अकोट-वणी-मारोळा-मुंडगाव हा रस्त्यावरील नाल्याला आलेल्या पुरामुळे वाहतूक बंद पडली आहे. तसेच तेल्हारा तालुक्यामध्ये सर्वांत जास्त 146.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या तालुक्यात अतिवृष्टीची नोंदही तेल्हारा मंडळ, माळेगाव मंडळ, हिवरखेड, आडगाव, पंचगव्हाण या ठिकाणी झालेली आहे.

अकोल्यात 'इतक्या' मिमी पावसाची नोंद : त्यासोबतच विद्रुप नदी व नाल्याला आलेल्या पुरामुळे मनपदा भांबेरी रस्ता बंद झाला आहे. तसेच पाथर्डी गावातील दोन व्यक्ती विदर्भ नदीला आलेल्या पुरामुळे शेतात अडकले होते. त्यांना जिल्हा शोध व बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले आहे. राजू देठे व भारसाकडे असे या दोन शेतकऱ्यांची नावे आहेत. तर बाळापूर तालुक्यामध्ये 24.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पातुर तालुक्यात 24.7 आणि मूर्तीजापूरमध्ये 23.0 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या तिन्ही तालुक्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा रस्ता बंद झालेला नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे माहिती देण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात रात्रभरात 139.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पावसामुळे ग्रामस्थ त्रस्त : हिवरखेड परिसरात 21 जुलैच्या मध्यरात्रीपासून अतिवृष्टी झाली असून ढगफुटीसदृश्य पाऊस 22 तारखेच्या सकाळपर्यंत सुरू आहे. या पावसामुळे अनेक नदी, नाल्यांना पूर आले असून नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकरी मनोज किसनराव खनपटे यांच्या घराची भिंत पडली असून गौरव भुडके यांच्या गोडाऊनची भिंतसुद्धा पडली आहे. पुलाचे काम करण्यासाठी पाण्याचा प्रवाह बाहेरून वळविण्यात आला. ज्यामुळे सार्वजनिक शौचालयाच्या खालून पूर्ण भरण वाहून गेलेले आहे. या पुलाच्या बाजूला बॉर्डर मुरूम ऐवजी नाल्यातून निघालेल्या गाळाचीच भरती टाकण्यात आली होती. म्हणून ती एकाच पावसात वाहून गेली. पुलाच्या आजूबाजूने पूर संरक्षण भिंतसुद्धा उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे आलेल्या पुराचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरत आहे.

हेही वाचा:

  1. Maharashtra Monsoon Rain : आज राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; पुणे, वसई विरारला रेड अलर्ट तर मुंबईला ऑरेंज अलर्ट
  2. Monsoon Rain Nanded : नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद; कुठे तलाव फुटला तर कुठे उखडले रस्ते,जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
  3. Irshalwadi Landslide rescue operation: इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांची संख्या 26 वर, बचावकार्याला पुन्हा सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.