ETV Bharat / state

'सुपर स्प्रेडर'कोरोना चाचणीला सुरुवात; फेरीवाल्यांचे घेतले नमुने - अकोला सुपर स्प्रेडर न्यूज

गेल्या मार्च महिन्यापासून देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या काहीशी कमी झाली होती. मात्र, दिवाळीनंतर पुन्हा रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन पुन्हा सक्रिय झाले आहे.

Corona Test
कोरोना चाचणी
author img

By

Published : Dec 3, 2020, 3:25 PM IST

अकोला - दिवाळीनंतर कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. शहरातील सुपर स्प्रेडर व्यक्तींच्या कोरोना चाचणीला सुरुवात झाली आहे.

अकोल्यात फेरीवाल्यांचे कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्यात आले

रुग्णसंख्येचा वाढता आलेख -

ऑक्टोबर महिन्यात राज्यभरात रूग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला होता. त्यामुळे नागरिकांना आणि आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, दिवाळीनंतर कोरोना रूग्णसंख्येचा आलेख पुन्हा वाढत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिवाळीपूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा इशारा दिला होता. शिवाय कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपायदेखील राज्याच्या आरोग्य विभागातर्फे सुचवण्यात आले होते. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे शहरातील विविध भागातील फेरीवाल्यांसह इतर 'सुपर स्प्रेडर' व्यक्तींचे नमुने घेण्यात आले.

187 जणांचे घेतले नमूने -

विशेष मोहिमेंतर्गत गांधी रोडवरील खुले नाट्यगृहासह गर्दीच्या ठिकाणी जाऊन 187 फेरीवाल्यांचे नमुने कोरोना चाचणीसाठी संकलित करण्यात आले. या चाचणी अहवालात प्रशासन लक्ष घालत आहे. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नागरिकांना खबरदारीचे आवाहन -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा इशारा आणि वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांनी नियमित मास्क, सुरक्षित अंतर आणि वारंवार हात धुण्यासारखे उपाय करावेत. आपली आणि आपल्या आजूबाजूच्या नागरिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.