ETV Bharat / state

पोलीस उपनिरीक्षकाचे चोरीस गेलेले पिस्तूल व जिवंत काडतुसे सापडली; दागिन्यांचा शोध सुरू - अकोला पोलीस शोधमोहीम

पोलीस उपनिरीक्षकाची सात दिवसांपूर्वी चोरीला गेलेले पिस्तूल व जिवंत काडतुसे त्यांच्याच घरामागील पटांगणात सापडली आहेत. जुने शहर पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने ही शोधमोहीम यशस्वी केली. या मोहीमेत पिस्तूल व काडतुसे सापडली असून, दागिन्यांचा शोध अद्यापही चालू आहे.

पोलीस उपनिरीक्षकाची सात दिवसांपूर्वी चोरीला गेलेली पिस्तूल व जिवंत काडतुसे त्यांच्याच घरामागील पटांगणात सापडली आहेत.
author img

By

Published : Jul 27, 2019, 8:35 PM IST

अकोला - पोलीस उपनिरीक्षकाची सात दिवसांपूर्वी चोरीला गेलेली पिस्तूल व जिवंत काडतुसे त्यांच्याच घरामागील पटांगणात सापडली आहेत. जुने शहर पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने ही शोधमोहीम यशस्वी केली. या मोहिमेत पिस्तूल व काडतुसे सापडली असून, दागिन्यांचा शोध अद्यापही चालू आहे.

गीता नगरमधील पोलीस वसाहतीत दोन दिवसांपूर्वी राहाण्यास आलेले पोलीस उपनिरीक्षक राजेश जोशी यांच्या घरी चोरी झाली होती. चोरट्यांनी ६० हजार रुपयांचे दागिने तसेच, एका सर्व्हिस रिव्हॉल्वरसहित दहा जिवंत काडतुसे लंपास केली. या घटनेनंतर पोलीस वसाहतीत एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ व जुने शहर पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांचे पथक आले होते.

पोलीस उपनिरीक्षकाची सात दिवसांपूर्वी चोरीला गेलेली पिस्तूल व जिवंत काडतुसे त्यांच्याच घरामागील पटांगणात सापडली आहेत.

जुने शहर पोलिसांच्या माध्यमातून घटनास्थळी सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये उपनिरीक्षक राजेश जोशी यांच्या घरामागील खुल्या पटांगणात दहा काडतुसांनी भरलेली पिस्तूल पोलिसांना सापडली. श्वान पथकातील लक्ष्मी नामक श्वानाने ही पिस्तूल शोधून काढली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Intro:अकोला - सात दिवसा आधी चोरी गेलेली त्यांच्या घराच्या मागेच असलेल्या खुल्या पटांगणात आज श्वान पथकाने शोधून काढली. यासाठी जुने शहर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. या ऑपरेशन मध्ये ही पिस्तूल मिळून आली. मात्र, चोरी गेलेले दागिन्यांचा शोध लागलेला नाही.Body:गीता नगरातील पोलिस वसाहतीमध्ये दोन दिवसाधी राहण्यासाठी आलेले पोलिस उपनिरीक्षक राजेश जोशी यांच्या घरी चोरट्यानी चोरी केली. चोरीत चोरट्यानी 60 हजार रुपयांचे दागिने आणि एक शासकीय पिस्तूल व दहा जिवंत काडतुस चोरून नेली. या घटनेनंतर पोलिस विभागात एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी पोलिस अधीक्षक अमोघ गावकर, अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय अधिकारी उमेश माने पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ, जुने शहर पोलिस निरीक्षक प्रकाश पवार यांचे पथक आले होते. त्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे आणि जुने शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी विविध ठिकाणी जाऊन आले. परंतु, आज घटनास्थळी जुने शहर पोलिसांनी श्वान पथकाच्या माध्यमातून सर्च ऑपरेशन राबविण्यात आल्याने पोलिस उपनिरीक्षक राजेश जोशी यांच्या घराच्या मागील खुल्या पटांगणात दहा काडतुसने भरलेली पिस्तूल पोलिसांना मिळून आली. श्वान पथकाच्या लक्ष्मीने ही पिस्तूल शोधून काढली.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.