ETV Bharat / state

एमपीएससीची परीक्षा रद्द झाल्याने अकोल्यात विद्यार्थी आक्रमक; पोलीस अधिकाऱ्यांना दिले निवेदन - akola news

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

Students aggressive in Akola due to cancellation of MPSC exams
एमपीएससीच्या परीक्षा रद्द झाल्याने अकोल्यात विद्यार्थी आक्रमक
author img

By

Published : Mar 12, 2021, 12:25 AM IST

अकोला - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. अकोल्यातील विद्यार्थ्यांनी याबाबत रोष व्यक्त केला. तसेच त्यांनी रामनगर येथील शिकवणीवर्ग समोरच त्यांनी नारेबाजी केली. एमपीएससी आयोग हॉल तिकीट देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा देते आणि नंतर ती रद्द करते, राज्य सरकारची ही भूमिका विद्यार्थ्यांना भविष्यात अंधाराकडे नेणारी असल्याची प्रतिक्रिया यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.

एमपीएससीची परीक्षा रद्द झाल्याने अकोल्यात विद्यार्थी आक्रमक

चार ते पाच वेळा ही परीक्षा रद्द -

राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा रद्द केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. चार ते पाच वेळा ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. कोरोनाचे कारण सांगत विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी भूमिका सरकारची आहे. त्यामुळे राज्य सरकारने ही परीक्षा पुन्हा घ्यावी, ज्या नियमात हवी असेल त्या नियमात घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी यावेळी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना मांडली आहे.

राज्य शासनाने लादलेला निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा-

एमपीएससीची परीक्षा देणारे विद्यार्थी हे गोरगरीब आहेत. त्यांना पुरेसा पैसा अभ्यासाकरता मिळत नाही. अनेक विद्यार्थी हे शेतकऱ्यांची मुलं आहेत. बरेच विद्यार्थी हे बाहेरगावचे आहेत. त्या विद्यार्थ्यांना शिकवणी वर्गाकरिता अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना घरून मिळणारा पैसा हा पुरेसा नसतो. तरीही हलाखीच्या परिस्थितीत ते एमपीएससीची तयारी करीत आहेत. विद्यार्थ्यांवर राज्य शासनाने लादलेला हा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा आहे. आधीच विद्यार्थ्यांचे वय वाढत आहेत. त्यामध्ये अशा वारंवार परीक्षा रद्द होत असेल तर विद्यार्थी हा बेरोजगारचं राहील. राज्य शासनाने परीक्षा रद्द न करता तसेच पुढे न ढकलता ती घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांचे निवेदन घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे ठाणेदार भानुप्रताप मडावी, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्यासह आदी पोलीस अधिकारी उपस्थित झाले होते.

हेही वाचा- एमपीएससी परीक्षेबाबत आठवडाभरात मुख्यमंत्री देणार स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.