ETV Bharat / state

नागरिकांनी केली पोलिसांवर दगडफेक; रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

घटनेनंतर घटनास्थळी अति शीघ्र पोलीस दल दाखल झाले होते. या घटनेमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, हा परिसर प्रतिबंधित आहे.

stone attack on police
नागरिकांनी केली पोलिसांवर दगडफेक
author img

By

Published : Apr 27, 2020, 10:27 AM IST

अकोला - संचारबंदी असतानाही काही नागरिक उल्लंघन करत असल्यामुळे त्यांना घरात जा, म्हणणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नागरिकांनीच दगडफेक केल्याची घटना रविवारी रात्री वायएस गॅरेजजवळ घडली. याप्रकरणी रामदासपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

नागरिकांनी केली पोलिसांवर दगडफेक

दरम्यान, घटनेनंतर घटनास्थळी अति शीघ्र पोलीस दल दाखल झाले होते. या घटनेमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, हा परिसर प्रतिबंधित आहे.

बैदपुरा परिसरात एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे हा परिसर प्रतिबंधित केला होता. तरीही नागरिक रस्त्यावर निघत होते. पोलीस गर्दीला वेगळे करण्यासाठी गस्त घालत असताना काहींनी त्यांच्यावर दगडफेक केली. तरीही पोलिसांनी सय्यम दाखवला. यानंतरही नागरिक ऐकत नसल्याचे दिसत होते. त्यांनी थेट पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच याप्रकरणी रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस दल घटनास्थळी तैनात करण्यात आले असून पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.