ETV Bharat / state

तीन महिन्यांचे वेतन थकीत; एसटी कर्मचाऱ्यांचे अकोल्यात आत्मक्लेश आंदोलन

author img

By

Published : Oct 9, 2020, 2:32 PM IST

अकोल्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आज विभागीय कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केले. कामगारांचे वेतन थकबाकीसह देण्यात यावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

ST workers' agitation in Akola
एसटी कर्मचाऱ्यांचे अकोल्यात आत्मक्लेश आंदोलन

अकोला- एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आज विभागीय कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केले. कामगारांचे वेतन थकबाकीसह देण्यात यावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

एसटी महामंडळाच्या कामगारांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यांचे वेतन तीन महिन्यांचा कालावधी संपूनही अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे कामगारांना त्वरित वेतन मिळावे, या मागणीसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे एस टी महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

कोरोनाच्या काळात कामगारांनी वेतन मिळत नसतानाही आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावले आहे. अशा परिस्थितीत कामगारांना कामाचा मोबदला म्हणून वेतन देणे, ही प्रशासनाची जबाबदारी आहे. परिणामी, प्रशासनाने कामगारांना थकीत वेतन तत्काळ देऊन त्यांच्यावरील आर्थिक संकट दूर करावे, या मागणीसाठी हे आत्मक्‍लेश आंदोलन करण्यात आले असल्याचे संघटनेचे विभागीय सचिव रूपम वाघमारे यांनी सांगितले.

या आंदोलनात विभागीय अध्यक्ष नांदुरकर, कविता नागवंशी यांच्यासह आदी कामगार सहभागी झाले होते. या आंदोलनाला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनीही भेट दिली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.