ETV Bharat / state

अकोला : भरलेल्या टँकरमधून इंधन चोरी करणारी टोळी जेरबंद - akola

डिझेल आणि पेट्रोलने भरलेल्या टँकरमधून इंधन चोरी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई कोळबी येथील रॉयल धाब्यावर केली.

अकोला
author img

By

Published : Jun 22, 2019, 9:43 PM IST

अकोला - डिझेल आणि पेट्रोलने भरलेल्या टँकरमधून इंधन चोरी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडून तब्बल 21 लाख 91 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने टँकरमधील डिझेल-पेट्रोल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. ही कारवाई कोळबी येथील रॉयल धाब्यावर केली.

अकोला

गायगाव येथून पेट्रोलियम कंपनीचे टँकर हे ग्राम कोळबी येथील रॉयल धाब्यावर येत असून धाबा मालक व टँकरचे चालक हे संगनमताने त्यामधून अवैधरित्या डिझेल, पेट्रोल काढून, साठवून, विक्री करतात, अशी माहिती मिळाली होती. त्यावरून रॉयल धाब्यावर जाऊन साडेचार वाजता पोलिसांनी छापा टाकला.

त्यावेळी धाब्याच्या मागे एक पेट्रोल-डिझेलचा टँकर (एम एच ३० एल ४२६८) उभा होता. त्यातून एका प्लास्टीकच्या पाईपने लोखंडी बॅरलमध्ये काही लोक पेट्रोल, डिझेल काढत होते. पेट्रोल-डिझेल चोरणाऱ्यांची नावे नदीम अहमद शेख, मोहम्मद आबीद शेख करीम, गजानन वाल्मीक चकनारायण, शेख मोहम्मद शेख इब्राहीम, सैयद आकीब सै. अलीम तसेच ट्रक चालक गुलाम फरीद गुलाम फारूख अशी आहेत.

या कारवाईत घटनास्थळावर व आरोपींकडून १५ लाख किमतीचा टँकर ताब्यात घेण्यात आला. ज्यामध्ये तीन कप्प्यात ९ केएल डिझेल, किंमत पाच लाख रूपये तसेच चौथ्या कप्प्यात ३ केएल पेट्रोल किंमत एक लाख 60 हजार रुपये असा एकूण 21 लाख 91 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाच्या पोलीस निरीक्षक मिलिंद भाकर यांनी केली.

Intro:अकोला - डिझेल आणि पेट्रोल ने भरलेल्या टँकरमधून इंधन चोरी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला पोलीस अधीक्षक सहा जणांच्या टोळीला पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाच्या पोलीस निरीक्षक मिलिंद भाकर यांनी आज अटक केली. या आरोपींकडून तब्बल 21 लाख 91 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे टँकरमधील डिझेल पेट्रोल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही कारवाई कोळबी येथील रॉयल धाब्यावर केली.Body:गायगांव येथून पेट्रोलीयम कंपनीचे टॅकर हे ग्राम कॉळबी येथील रॉयल धाब्यावर येत असून नमूद धाबा मालक व टॅकरचे चालक हे संगनमताने त्यामधून अवैधरित्या डिझेल, पेट्रोल काढून,
साठवून, विक्री करतात. अशा माहितीवरून रॉयल धाब्यावर जावून १६.३० वाजता धाड टाकली. धाब्याच्या मागे एक पेट्रोल डिझेलचा टॅकर कृमांक एम एच ३० एल ४२६८ उभा दिसला. त्यामधून एका प्लॉस्टीकच्या पाईपाने लोखंडी बॅरलमध्ये काही लोक पेट्रोल, डिझेल काढतांना दिसून आले. त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नांव, पत्ता विचारले
असता त्यांनी आपले नाव नदीम अहमद शेख, मोहमंद आबीद शेख करीम, गजानन वाल्मीक चकनारायण, शेख मोहंमद शेख इब्राहीम, सैयद आकीब सै. अलीम तसेच ट्रक चालक गुलाम फरीद गुलाम फारूख असे सांगीतले. घटनास्थळावर व
आरोपीतांकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल मिळून आला. टॅकर क्रमांक एएच ३० एल ४२६८ किंमत १५ लाख। रूपय ज्यामध्ये तीन कप्प्यात ९ केएल डिझेल किंमत पाच लाख रूपय तसेच चौथ्या कप्प्यात ३ केएल पेट्रोल किंमत एक लाख 60 हजार रुपये असा एकूण 21 लाख 91हजार रुपायांचा माल जप्त केला.Conclusion:सूचना - सोबत व्हिडीओ आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.