अकोला - शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आज सहाने वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण आकडा आता 38 वर पोहोचला आहे. तर शुक्रवारी रात्री दाखल झालेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या पाच झाली आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी एक रुग्ण मोहम्मद अली रोडवरील रहिवासी आहे. तर उर्वरित पाच हे एका मृत बाधित महिलेच्या संपर्कातील आहेत. ते सर्व जण एका खासगी रुग्णालयात काम करतात. त्यात एका डॉक्टरचाही समावेश आहे. मृत महिला शासकीय रुग्णालयात येण्याआधी या दवाखान्यात उपचारासाठी गेली होती.
आज प्राप्त अहवाल - ४७
पॉझिटीव्ह- सहा
निगेटीव्ह- ४१