अकोला : बुधवारी रात्री जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप यांच्या घरावर हल्ल्यामुळे शिंदे गटातील वाद समोर आले आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत वाद मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. राजकीय वैमान्यातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. हल्लेखोर नेमके कोण होते याचा तपास पोलीस करत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विठ्ठल पाटील सरप यांच्या गोरक्षण रोडवरील सहकार नगरातील घरावर बुधवारी रात्री चार ते पाच अज्ञातांनी हल्ला केला. यात घरातील साहित्याची नासधुस करण्यात आली. याबाबतची माहिती मिळताच खदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रात्री उशिरा तक्रार घेतली.
राजकीय वैमान्यातून हा हल्ला : राजकीय वैमान्यातून हा हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद झाले आहेत. त्यामुळे शिंदे गटातील हे पदाधिकारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. राजकीय द्वेषातून शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा विठ्ठल सरप यांच्या घरावर त्यांच्या स्वपक्षातील काहींनी हा हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. खदान पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीरंग सणस हे ताफ्या संघटनास्थळावर दाखल झाले होते. या प्रकरणाचा ते तपास करीत आहेत. दरम्यान, यामध्ये सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. तसेच हल्लेखोरांनी यावेळी त्यांच्या घरातील साहित्याची नासधूस केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला पोलिसांकडून गांभीर्याने घेतल्या जात आहे. शिंदे गटातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्यामुळे जिल्ह्यातील शिंदे गटाचे पक्ष संघटन मजबूत होईल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दोन महिन्यांपासून पक्षांतर्गत वाद : जिल्ह्यातील शिंदे गटात गेल्या दोन महिन्यांपासून पक्षांतर्गत गंभीर वाद सुरू होता. या वादातच आधी जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून गोपीकिशन बाजोरियांना हटविल्याची घटना घडली होती. या घटनेनंतरच अकोल्यात बाजोरिया गट विरूद्ध इतर हा शिवसेनेतील वाद हा वाढला आणि तो तोडफोड आणि मारहाणीवर गेला होता. जिल्हाधिकारी विठ्ठल सरप यांचे गोरक्षण मार्गावरील सहकारनगर भागात घर आहे. या घरावर बाजोरिया समर्थकांनी घरी हैदोस घातला. दरम्यान, घटनेनंतर जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप कुटूंबियांसह रात्री बाजोरिया गटाविरूद्ध पोलीस तक्रारीसाठी खदान पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी जिल्हाधिकारी विठ्ठल सरप आणि कुटुंबियांचा जवाब नोंदवला आहे. बाजोरिया समर्थक प्रकाश पाटील यांच्यासहउपजिल्हाप्रमुख योगेश बुंदेले आणि अन्य पाच जणांकडून तोडफोड करण्यात आल्याचा आरोप सरप यांनी केला आहे. तसेच सरप यांना धक्काबुक्की झाल्याचाही आरोप होतोय. मात्र अद्यापही गुन्हे दाखल झाले नाहीयेत.