अकोला - जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे ज्येष्ठ कलावंतांसाठी मानधन योजना राबवली जाते. या योजनेसाठी एक समिती निवड करण्यात आली आहे. ही समिती ६० ज्येष्ठ कलावंतांची निवड करून त्यांना मानधन योजनेसाठी पात्र ठरविणार आहे. या निवड प्रक्रियेला ११ जानेवारी पासून जिल्हा परिषदेच्या सभागृहात सुरुवात झाली आहे.
समाजकल्याण विभागातर्फे ज्येष्ठ कलावंतांना मानधन मिळावे, यासाठी दोन दिवस एका समितीच्या माध्यमातून निवडण्यात आलेल्या कलावंतांना दिले जाणार आहे. जिल्ह्यातील २८० ज्येष्ठ कलावंतांनी यासाठी अर्ज केला होता. या अर्जानुसार निवडलेल्या समितीतर्फे कलावंतांची निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
या कलावंतांमध्ये कवी, गायक, कव्वाली गायक, शाहीर, गोंधळी, समाज प्रबोधन करणारे कलावंत यांच्यासह महिला कलावंतही मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. यापैकी ६० कलावंतांची निवड करून त्यांना मानधन मिळणार आहे.
या समितीसमोर सर्व कलावंत आपली कला सादर करत आहेत. त्यामुळे सभागृहात कलावंताची मोठी उपस्थिती होती.