अकोला - बाळापूर शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेवर दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. बँकेची तिजोरी फोडता न आल्यामुळे दरोडेखोरांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. ही घटना रविवारी उघडकीस आली.
हेही वाचा- काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सविस्तर चर्चेनंतरच सत्तास्थापनेबाबत निर्णय होईल - शरद पवार
या घटनेमुळे बाळापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बँकेची सुरक्षा ही वार्यावर असल्याचे दिसून येत आहे. बाळापूर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत चोरट्यांनी प्रवेश द्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. रात्री दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. बँकेची तिजोरी तोडण्यासाठी आणलेले साहित्यही अपयशी ठरल्यामुळे दरोडेखोरांनी तिजोरी आणि एटीएमवर प्रहार करत ती फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, दरोडेखोर त्यातही यशस्वी झाले. बँकेतच्या सुरक्षेसाठीही सुरक्षारक्षक नसल्याचे दिसून आले आहे.