अकोला - पहिल्या चोरीचा तपास लागत नाही तोच दुसऱ्या चोरीत चोरट्यांनी साडेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या दुसऱ्या चोरीत गिरी नगरातील सद्गुरू इंडियन गॅस एजन्सीच्या कार्यालयातील सव्वाचार लाख रुपयांची रोख लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे, चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून हे चोरटे एका कारमध्ये चोरी करण्यासाठी आले होते. विशेष म्हणज याच काळात खदान पोलीस ठाण्याचे अमरावती विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून तपासणी करण्यात येत आहे. त्यातच चोरट्यांनी केलेल्या या चोरीमुळे पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीची तिसरी घटना घडली आहे. या तिन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी ४ लाखांच्या वरतीच मुद्देमाल लंपास केला आहे. पहिल्या चोरीचा तपास खदान पोलिसांनी लावल्यानंतर दुसऱ्या घटनेला चोरट्यांनी साध्य करीत एका घरातून साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेच्या तपासला सुरुवात होत नाही तोच चोरट्यांनी तिसरी चोरी घडवून आणत सद्गुरू इंडेन गॅसच्या एजन्सीच्या कार्यालयात असलेल्या गल्ल्यातील रोख सव्वाचार चोरून नेले.
हेही वाचा - अकोल्यात चोरट्यांचा धुमाकूळ; चार लाखांचा ऐवज लंपास
चोरट्यांनी कंपनीच्या कार्यालयाचे प्रमुख द्वार तोडून आत प्रवेश केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा एकटाच दिसला. खदान पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून घटनास्थळी श्वान पथक, ठसे तज्ज्ञ पथक दाखल झाले होते. विशेष म्हणजे, खदान पोलीस ठाण्यात अमरावती पोलीस महानिरीक्षक यांची तपासणी आहे. असे असताना चोरट्यांनी केलेल्या या चोरीमुळे खदान पोलिसांना चांगलेच आव्हान मिळाले असून स्थानिक गुन्हे शाखेलाही या चोरीचा तपास लावण्यात कस लागणार आहे.
हेही वाचा - सलग १२ महिने काम मिळण्यासाठी शेतमजुरांचे कृषी विद्यापीठासमोर धरणे