ETV Bharat / state

Robbers Break ATM अकोल्यात दरोडेखोरांनी गॅसकटरने फोडले एटीएम; साडेसोळा लाखांची रोकड लंपास - Khadan Police Station Akola

अकोल्यात दरोडेखोरांनी गॅस कटरने एटीएम ( Robbers Used Gas Cutter To Break ATM ) फोडून साडेसोळा लाख रुपये ( 16 lakh Stolen From Akola ) लांबवल्याने खळबळ उडाली. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. केशवनगर परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियातील ( State Bank Of India Akola ) एटीएम दरोडेखोरांनी फोडले. सध्या खदान पोलिसांकडून या घटनेतील दरोडेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.

Robbers Break ATM Akola
स्टेट बँक ऑफ इंडियाचे दरोडेखोरांनी फोडलेले एटीएम
author img

By

Published : Jan 5, 2023, 6:15 PM IST

Updated : Jan 5, 2023, 8:20 PM IST

अकोल्यात दरोडेखोरांनी गॅसकटरने फोडले एटीएम; साडेसोळा लाखांची रोकड लंपास

अकोला - मध्यरात्री गॅस कटरने एटीएम फोडून ( Robbers Used Gas Cutter To Break ATM ) साडेसोळा लाखाची रोकड लंपास ( 16 lakh Stolen From Akola ) केल्याने खळबळ उडाली. ही घटना केशव नगर स्थित रिंग रोड मुख्य रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत ( State Bank Of India Akola ) घडली. घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत असून अद्याप पोलिसांना चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही.

शहरात काही दिवसापासून चोरीचे सत्र शहरात गत काही दिवसापासून चोरीचे सत्र सुरु असून सर्वात जास्त चोरीचे प्रमाण खदान परिसरात घडत आहेत. घरफोडी, दुचाकी चोरी, मोबाईल चोरी ही तर नित्याची बाब बनली आहे. आता तर चक्क चोरट्यांनी एटीएमवर लक्ष केंद्रित केले आहे. थंडीची चाहूल त्यात पोलीस भरती असल्याने पोलीस कामात व्यस्त आहेत. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारस रिंग रोडवरील एसबीआय बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडल्याची घटना समोर आली. गॅसकटरने हे एटीएम फोडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. एटीएममधून 16 लाख 54 हजारची रक्कमेवर चोरट्यांनी हात साफ केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक गुन्हे शाखा, खदान पोलिसांचा ताफा ( Khadan Police Station Akola ) घटनास्थळी दाखल झाला. जवळपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु आहे.

खदान पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या महिन्याभरात चोऱ्या करून चोरट्यानी खदान पोलिसांसमोर आव्हान उभे केले. तर आज मुख्य रस्त्या लगत असलेले हे एटीएम फोडून चोरट्यांच्या टोळ्या सक्रीय झाल्याचे या घटनांवरुन दिसून येत आहे. चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसिंगची आता गरज असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

रात्रीची गस्त फक्त नावाला शहरात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांची आधी रात्र गस्त असायची. मात्र, रात्रीच्या गस्ती ऐवजी पोलीस रात्री दहा वाजता दुकाने बंद करण्यासाठी फिरताना दिसतात. त्यानंतर मात्र गस्त मारताना पोलीस दिसत नाहीत. रात्रीच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसते. मात्र, पोलीस गस्त वाढलेली दिसत नाही. गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असला तरी मात्र पोलिसांच्या गस्तीचा जोर हा थंडीसारखाच दिसत आहे. रात्रीची गस्त बंद झाल्याचे चित्र आहे.

सुरक्षा रक्षक नसल्याने सुरक्षा वाऱ्यावर जिल्ह्यातील विविध बँक कंपनीच्या एटीएमवर सुरक्षा रक्षक नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे सर्व एटीएमची सुरक्षा ही वाऱ्यावर आहे. पोलिसांनी अनेकवेळा सूचना करूनही सुरक्षा रक्षक ठेवण्यात येत नसल्याचे दिसते.

Last Updated : Jan 5, 2023, 8:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.