ETV Bharat / state

तीन वर्षांच्या बालकाचा फेर तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

बैदपुरा या परिसरात सात एप्रिल रोजी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. त्यानंतर प्रशासनाने या रुग्णाच्या नातेवाईक आणि त्याच्याशी संपर्क असलेल्यांची तपासणी केली होती. त्यामध्ये एका कुटुंबातील चार जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. यातील तीन वर्षांच्या बालकाची तिसऱ्यांदा फेर तपासणी करण्यात आली होती. या तपासणीतही हा बालक पॉझिटिव्ह आला आहे.

Corona positive
कोरोना पॉझिटिव्ह
author img

By

Published : Apr 28, 2020, 1:09 PM IST

अकोला - बैदपुरा या परिसरातील तीन वर्षाच्या बालकाचा तिसरा फेर तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 10 एप्रिलला या बालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याची तीनदा कोरोना चाचणी घेण्यात आली.

बैदपुरा या परिसरात सात एप्रिल रोजी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. त्यानंतर प्रशासनाने या रुग्णाच्या नातेवाईक आणि त्याच्याशी संपर्क असलेल्यांची तपासणी केली होती. त्यामध्ये एका कुटुंबातील चार जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. या कुटुंबातील तीन वर्षांचा मुलगा, पाच वर्षांची मुलगी, आई एका 30 वर्षांच्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून एका दीड वर्षाच्या मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला.

यातील तीन वर्षांच्या बालकाची तिसऱ्यांदा फेर तपासणी करण्यात आली होती. या तपासणीतही हा बालक पॉझिटिव्ह आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी या बालकावर उपचार करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.