अकोला - आठ दिवसांपासून रिमझिम पडणाऱ्या पावसाने आज दमदार हजेरी लावली. यामुळे अकोलेकरांना दिलासा मिळाला आहे.
अकोलेकरांना दमदार पावसाची प्रतिक्षा होती. ही प्रतिक्षा मात्र परतीच्या पावसात पूर्ण झाली. या पावसाळ्यात रिमझिम पाऊस पडला. वातावरण तापत होते. त्यामुळे रिमझिम पाऊस पडूनही काहीच उपयोग होत नव्हता. कारण, जिल्ह्यात मोठ्या पावसाची सर्वांना अपेक्षा होती. जिल्ह्यातील काही गावात रात्री जोरदार पाऊस पडला. दरम्यान, जोरदार पावसाच्या हजेरीने अकोलेकरांना दिलासा मिळाला असून बळीराजालाही मोठा आनंद झाला आहे.