ETV Bharat / state

Protest Against Tax Hike In Akola : अकोल्यात करवाढीला विरोध.. हद्दवाढ कृती समितीच्या वतीने महापालिकेसमोर निदर्शने

author img

By

Published : Feb 17, 2022, 7:08 PM IST

अकोल्यात महापालिकेच्यावतीने ( Akola Municipal Corporation ) करण्यात आलेल्या पाणी करवाढीला ( Water Tax Hike Akola ) मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. हद्दवाढ कृती समितीच्यावतीने या विषयासह विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात ( Protest Against Tax Hike In Akola ) आली.

अकोल्यात करवाढीचा विरोध.. हद्दवाढ कृती समितीच्या वतीने महापालिकेसमोर निदर्शने

अकोला - महानगरात कर वाढीचा मुद्दा पेटलेला आहे. बुधवारी शिवसेनेने यासाठी आंदोलन केले होते. आजही याच मुद्द्याला व इतर विषयांना घेऊन हद्दवाढ कृती समितीने मनपासमोर ( Akola Municipal Corporation ) आंदोलन केले आहे. महापालिकेतर्फे हद्दवाढ परिसरात कुठल्याही प्रकारचा विकास करण्यात आलेला नाही. उलट करवाढ करून येथील नागरिकांची लूट करण्यात येत आहे. त्यासोबतच वाढीव पाणी करवाढ ( Water Tax Hike Akola ) करून आणखीन त्यात भर टाकली आहे. महापालिकेच्या प्रशासन आणि सत्ताधारी भाजपच्या विरोधामध्ये हद्दवाढ कृती समितीने महापालिकेवर आज मोर्चा काढून निदर्शने करण्यात ( Protest Against Tax Hike In Akola ) आली. यानंतर सर्वसाधारण सभा सुरू असताना विरोधीपक्ष नेत्यांना सोबत घेऊन महापौर आणि आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. तसेच या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणीही त्यांनी या निवेदनातून केली आहे.

विकासच झाला नाही

महापालिका निवडणुकीचे वारे सुरू असतानाच विविध पक्षांकडून वेगवेगळ्या मुद्यांसाठी महापालिकेसमोर आंदोलन करण्यात येत आहे. याच विषयाला धरून शिवसेनेने बुधवारी वाढीव पाणी करवाढ विरोधात आंदोलन केले होते. महापालिका क्षेत्रातील हद्दवाढ कृती समितीनेही काही मुद्द्याला धरून महापालिकेसमोर आंदोलन केले. हद्दवाढ झालेल्या भागांमध्ये कुठलाही विकास झालेला नसल्याचे यावेळी कृती समितीने म्हटले आहे. त्यासोबतच कर वाढ आणि वाढीव पाणी करवाढ विरोधातही या समितीने महापालिकेसमोर आंदोलन केले.

शेकडो नागरिक सहभागी

शेकडो नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असताना विरोधी पक्ष नेता डॉ. जीशान हुसेन यांच्याकडे समितीचे पदाधिकारी गेले होते. समितीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन विरोधी पक्ष नेता डॉ. हुसेन यांनी सभा सुरू असताना महापौर आणि मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. समितीच्या मागण्यांवर मनपा प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी समिती व विरोधी पक्षनेता यांच्याकडून करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.