अकोला - जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते, अखेर आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसासोबत गारा देखील पडल्या आहेत. या पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला असून, उष्णतेमुळे त्रस्त असलेल्या अकोलेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. ऊन, सावलीचा खेळ सुरू होता. अखेस सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. दरम्यान पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले.
ग्रामीण भागात जोरदार पाऊस
ग्रामीण भागात पावसाने चांगलाच जोर धरला होता. आलेगाव येथे गारांसह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यासोबतच पातुर तालुक्यातही पाऊस पडला. अकोट आणि तेल्हारा या दोन्ही तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार वाऱ्यासह हजेरी लावली. मुर्तीजापूरमध्येही काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे.
हेही वाचा - भंडारा : जमिनीच्या वादातून प्रॉपर्टी डीलरची हत्या, 3 आरोपींना अटक