ETV Bharat / state

राज्यात सरकार स्थापन झाल्यास प्रकाश आंबेडकर हेच मुख्यमंत्री - अण्णाराव पाटील

राज्यात सरकार स्थापन झाल्यास प्रकाश आंबेडकर हेच मुख्यमंत्री राहतील, कार्यकर्त्यांची देखील हिच मागणी आहे. असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते अण्णाराव पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केले. वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी वंचित आघाडीचे एक शिष्टमंडळ अकोल्यात आले.

प्रकाश आंबेडकर हेच मुख्यमंत्री राहतील - अण्णाराव पाटील
author img

By

Published : Jul 15, 2019, 4:25 PM IST

अकोला - वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी वंचित आघाडीचे एक शिष्टमंडळ अकोल्यात आले. यावेळी अण्णाराव पाटील यांनी राज्यात सरकार स्थापन झाल्यास प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री राहतील, त्यांच्याशी अजून याबाबत चर्चा झाली नाही. परंतु तेच आम्हा सर्वांचे मुख्यमंत्री आहेत, असे वक्तव्य केले.

प्रकाश आंबेडकर हेच मुख्यमंत्री राहतील - अण्णाराव पाटील

अकोल्यामध्ये विधानसभा निहाय पाचही मतदार संघात शंभर अर्ज प्राप्त झाले आहेत. अजूनही काही अर्ज येत आहे. आगामी निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी 288 जागांची तयारी करत आहे. सक्षम, चरित्रसंपन्न व गुन्हेगारी स्वरुपाचा नसलेल्या उमेदवारालाच आम्ही उमेदवारी देणार आहोत. राज्याच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून आम्हाला प्रस्ताव आलेला नाही आणि आमचाही प्रस्ताव त्यांच्याकडे गेलेला नाही. तसेच एमआयएम 100 जागा मागितल्याचाही प्रस्ताव आलेला नाही. आमचा हा अंतर्गत विषय असून तो आम्ही चर्चेने सोडवणार आहोत. लोकसभेमध्ये 41 लाख मते मिळाल्याने जनतेने आमच्यावर विश्वास टाकला आहे, यामुळे आमचाही विश्वास वाढला आहे. असे पाटील यावेळी म्हणाले. अकोला येथील येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेससोबत वाटाघाटी करण्याआधी काँग्रेसने सिद्ध करावे की वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम कशी आहे, याबाबत त्यांनी प्रथम खुलासा करावा. अन्यथा 41 लाख मतदारांची माफी मागावी, असे आवाहन अण्णाराव पाटील यांनी यावेळी केले.

काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीत कमी लेखले. काँग्रेस उमेदवारांचे अर्ज भरून घेण्यासाठी पैसे घेते, आम्ही आमच्या उमेदवारांचे अर्ज मोफत घेत आहोत. त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने वंचित आहोत, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केले.

Intro:अकोला - राज्यात सरकार स्थापन झाल्यास प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री राहतील, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. याबाबत त्यांच्याशी अजून पर्यंत चर्चा झाली नाही. परंतु ते आम्हा सर्वांचे मुख्यमंत्रीच आहे, असे गौरवोद्गार वंचित बहुजन आघाडीचे नेते अण्णाराव पाटील यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केले.

Body:शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधानसभानिहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी आघाडीचे एक शिष्टमंडळ अकोल्यात आले. अकोल्यामध्ये पाचही मतदार संघात शंभर अर्ज प्राप्त झाल्याने तसेच अजूनही काही अर्ज येत आहे. आगामी निवडणुकांमध्ये 288 जागांची तयारी करत आहोत. सक्षम, चरित्रसंपन्न, गुन्हेगार स्वरुपाचा नसलेला उमेदवार आम्ही शोधत आहोत. लोकसभेमध्ये 41 लाख मते मिळाल्याने आमचा विश्वास व जनतेने आमच्यावर टाकलेला विश्वास वाढला आहे, असेही पाटील म्हणाले.
राज्याच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस कडून आम्हाला प्रस्ताव आला नाही. आमचाही प्रस्ताव त्यांच्याकडे गेलेला नाही. तसेच एमआयएम 100 जागा मागीतल्याबाबतचा प्रस्ताव मिळालेला नाही. आमचा हा अंतर्गत विषय असून तो चर्चेने सोडणार आहोत.
काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीत कमी लेखले. काँग्रेस उमेदवारांचे अर्ज भरून घेण्यासाठी पैसे घेते, आम्ही आमच्या उमेदवारांचे अर्ज मोफत घेत आहोत. त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने वंचित आहोत, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे यांनी व्यक्त केले. काँग्रेस सोबत वाटाघाटी करण्याआधी काँग्रेसने सिद्ध करावे की वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम कशी आहे, याबाबत त्यांनी खुलासा करावा. अन्यथा 41 लाख मतदारांची माफी मागावी, असे आवाहन अन्नराव पाटील यांनी केले. या पत्रकार परिषदेला रेखा ठाकूर, प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाठ, जिल्हा परिषद सदस्य प्रतिभाताई अवचार, वंदना वासणीक, सीमांत तायडे, शंकरराव इंगळे, प्रदीप गवई, महादेव शिरसाठ, प्रसन्नजीत गवई, पराग गवई यांच्यासह आदी उपस्थित होते.

Conclusion:सूचना - सोबत व्हिडीओ आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.