ETV Bharat / state

आंबेडकरांचे शक्तिप्रदर्शन, सोलापूरनंतर अकोल्यातूनही भरला उमेदवारी अर्ज

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज दुपारी आपल्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयापासून मिरवणूक काढली आणि जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल केले.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Mar 26, 2019, 6:01 PM IST

अकोला - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज दुपारी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल केले. यावेळी पोलिसांनी सुरक्षेसाठी तगडा बंदोबस्त ठेवला होता.

लोकसभा निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आंबेडकरांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयापासून मिरवणूक काढली आणि जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. या हजारो कार्यकर्त्यांच्या सुरक्षेसाठी भीम सैनिक दल तसेच पोलिसांचाही मोठा ताफा होता. ही मिरवणूक टॉवर चौक, गांधी चौक, पंचायत समिती मार्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली.

आंबेडकर अर्ज दाखल करण्यासाठी येण्यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १०० मीटरच्या आत शेकडो कार्यकर्ते आधीपासूनच त्यांची वाट पाहत होते. मात्र, पोलिसांनी या कार्यकर्त्यांना बाजूला करत फक्त पाच जणांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पाठवले. यावेळी आंबेडकरांनी डोक्यात मुस्लीम टोपी, भगव्या रंगाचा शर्ट आणि गळ्यात विविध समाजाच्या परंपरेनुसार माळा घातलेल्या होत्या. त्यांच्या या वेशभूषेने ते वंचित बहुजनांना एकत्रित केले असल्याचे दाखवत होते, अशी चर्चा होती. आंबेडकर हे अर्ज दाखल करून आल्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला.

Intro:अकोला - वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अड. प्रकाश आंबेडकर यांनी हजारो पक्ष कार्यालय यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढून जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी नामनिर्देशन पत्र दाखल केले. यावेळी कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहून पोलिसांनी सुरक्षेसाठी तगडा बंदोबस्त ठेवला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शंभर मीटरच्या आत मध्ये ही शेकडो कार्यकर्ते आधीपासूनच त्यांची वाट पाहत होते. परंतु, उपस्थित पोलिसांनी त्यांना बाजूला सारत फक्त पाचच जणांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पाठवले.

Body:लोकसभा निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते एड. प्रकाश आंबेडकर यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयापासून मिरवणूक काढीत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. या हजारो कार्यकर्त्यांच्या सुरक्षेसाठी भिम सैनिक दल तथा पोलिसांचाही मोठा ताफा होता. या मिरवणुकीत घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ही मिरवणूक टॉवर चौक, गांधी चौक, पंचायत समिती मार्ग इथून मार्गस्थ होत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. जिल्हाधिकारी कार्यालयात आधीपासूनच वंचित बहुजन आघाडी तथा भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते आत मध्ये उपस्थित होते. त्यामुळे पोलिसांना आत मधे ही तगडा बंदोबस्त ठेवावा लागला. दरम्यान, प्रकाश आंबेडकर हे डोक्यात मुस्लिम टोपी घालून भगवा रंगाचा शर्ट आणि त्यांच्या गळ्यात विविध समाजाच्या परंपरेनुसार माळा घातलेल्या होत्या. त्यांच्या या वेशभूषेने ते वंचित बहुजनांना एकत्रित केले असल्याचे दाखवीत होते, अशी चर्चा होती.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर हे अर्ज दाखल करून आल्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. त्यावेळी ही कार्यकर्त्यांकडून नारेबाजी सुरुच होती.

Conclusion:सूचना - या बातमीत प्रकाश आंबेडकर यांचा बाईट सोबत पाठवीत आहे. तर त्यांनी काढलेल्या मिरवणुकीचे व्हिडीओ मेल करीत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.