ETV Bharat / state

...तर 'वंचित' तुमची जोडणी पुन्हा जोडून देईल - प्रकाश आंबेडकर

author img

By

Published : Nov 20, 2020, 10:34 PM IST

राज्यातील जनतेच्या पाठिशी वंचित बहुजन आघाडी राहणार आहे. जनतेने वीज बील भरू नये. वीज बील भरले नाही म्हणून जोडणी तोडल्यास वंचित ही जोडणी पुन्हा जोडून देईल, अशी ग्वाही अ‍ॅड.आंबेडकर यांनी दिली. वीज बील माफी संदर्भात राज्यातील उर्जामंत्र्यांची भूमिका दुटप्पी आहे. हे राज्याचे दुर्दैव असल्याची टीका त्यांनी केली.

अकोला
अकोला

अकोला - महावितरण कंपनीने कोरोना संकटात जनतेला विज बिलात पन्नास टक्के सूट देण्यास तत्वतः मान्यता दिली होती. त्या संदर्भातील एक फाईल व त्यावरील शेरा हा विचारात घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला वीज बिलासंदर्भात मोठा दिलासा द्यावा. पण, या संदर्भातील ती फाईल राज्यातील एका मंत्र्यांने दाबल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यांनी या मंत्र्यांच्या नावाचा खुलासा आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला नाही.

प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद

राज्याच्या उर्जा मंत्र्यांना महावितरण कंपनीने सूट देण्यासंदर्भात व ती सूट दिल्याने कुठलाही फरक पडणार नाही, असा शेरा असलेली फाईल माहिती नाही. त्यामुळे पहिले सूट देण्याची घोषणा केली गेली आणि आता पूर्ण वीज बिल भरण्याचा आदेश उर्जामंत्री देत आहेत. अशा वेळी राज्यातील जनतेच्या पाठिशी वंचित बहुजन आघाडी राहणार आहे. जनतेने वीज बील भरू नये. वीज बील भरले नाही म्हणून जोडणी तोडल्यास वंचित ही जोडणी पुन्हा जोडून देईल, अशी ग्वाही अ‍ॅड.आंबेडकर यांनी दिली. वीज बील माफी संदर्भात राज्यातील उर्जामंत्र्यांची भूमिका दुटप्पी आहे. हे राज्याचे दुर्दैव असल्याची टीका त्यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारचा कारभार कोण चालवित आहे?

राज्याचा कारभार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे चालवित आहेत काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज्यातील एक मंत्री ज्याने ही फाईल दाबली तो राज्याचा कारभार चालवित आहे काय? अशी विचारणाच यावेळी अ‍ॅड. आंबेडकर यांनी केली. महाविकास आघाडी सरकारचा कारभार कोण चालवित आहे? असा प्रश्न अ‍ॅड. आंबेडकरांनी विचारला आहे. या पत्रकार परिषदेला जि.प. अध्यक्षा प्रतिभा भोजने, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रमोद देंडवे, प्रदीप वानखडे, चंद्रशेखर पांडे, राम गव्हाणकर, राजेंद्र पातोडे, प्रा. प्रसन्नजीत गवई आदिंची उपस्थिती होती.

विरोधकांच्या दबावावर सरकारचे निर्णय

हे महाविकास आघाडीचे सरकार विरोधक चालवित आहे. सरकारने स्वतः काही बाबतीत निर्णय घेण्याची गरज आहे. तसे होताना दिसत नाही. विरोधक मागणी करतात मग त्या मागणीचा पाठपुरावा सरकार करते. म्हणजेच हे सरकार स्वतःहून चालविले जात नसून ते विरोधकांद्वारे चालविले जात आहे, अशी खोचक टीका अ‍ॅड.आंबेडकर यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.