ETV Bharat / state

अहमदनगर : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त, २ आरोपी फरार

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचा मालक कोण आहे, हे अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन अज्ञातांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेला डंपर
author img

By

Published : Jun 9, 2019, 8:10 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यात अवैधपणे वाळू बिनदिक्कतपणे वाहतूक सुरू आहे. अशीच अवैध वाहतूक करणारा डंपर संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिसांनी पकडला आहे. ही कारवाई पोलिसांनी रविवारी सकाळी केली. डंपरमधील ४ ब्रास वाळूसह सुमारे १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घटनेतील दोन आरोपी पसार झाले आहेत.

खासगी पिकअप वाहनातून संगमनेर तालुक्यातील साकुर परिसरात अवैध वाळू उपसा होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक भुसारे यांना मिळाली होती. माहितीनुसार पोलीस हे खैरदरा शिवारात जांबुत बुद्रुक येथी मुळा नदीपात्रात पोहोचले. त्यावेळी अज्ञात आरोपी विनापरवाना वाळू उपसा करून डंपर भरत होते. पोलीस नदीपात्रात जाऊन कारवाई करण्यापूर्वी डंपर चालक व अज्ञात आरोपी यांनी वाहन व मोबाईल असे साहित्य त्याठिकाणी सोडून पळ काढला.

जप्त करण्यात आलेला डंपर

पोलिसांनी घटनास्थळावरून डंपर (एमएच१४ जीयू ७७९७) जप्त केला आहे. तर दोन मोबाईल, ४ ब्रास वाळू, यांसह एकूण १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचा मालक कोण आहे, हे अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन अज्ञातांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश मोहिते करीत आहेत.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

संगमनेरमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला.....

संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला. रविवारी सकाळी ही कारवाई केली..त्यामधील ४ ब्रास वाळूसह सुमारे १० लाख २० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन जण पसार झाले असून अज्ञातांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खाजगी पिकअप वाहनातून साकुर परिसरात अवैध वाळू उपशाविषयी माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक भुसारे यांना गुप्त खब-यामार्फत संगमनेर तालुक्यातील पठारभागातील खैरदरा शिवारात जांबुत बु येथे मुळा नदीपात्रात अज्ञात आरोपी विनापरवाना वाळू उपसा करून एक डंपर भरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस नदीपात्रात जाऊन कारवाईवेळी डंपर चालक व एक अज्ञात आरोपी यांनी वाहन, मोबाईल असे साहित्य त्याठिकाणी सोडून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळावरून एक डंपर (क्रमांक.एम.एच.१४ जी.यु.७७९७) दोन मोबाईल, ४ ब्रास वाळू, यांसह एकूण १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संबंधित डंपर चा मालक कोण आहे, हे अद्याप कळू शकले नाही.
दरम्यान,याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे यांनी दिलेल्या फियार्दीवरून दोन अज्ञातांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश मोहिते करीत आहे....Body:MH_AHM_Shirdi Sand Action_9 June_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi Sand Action_9 June_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.