अकोला - फतेह चौकात तलवार घेऊन फिरणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली. या आरोपींच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरातून दहा तलवारी मिळाल्या आहेत. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. या चौघांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
फतेह चौकात सोहल खॉन उर्फ मुन्ना डॉन इलीयास खान, सै. नवाब से. कासम, मजफ्फरशहा उर्फ मुज्जू अब्दुलशहा, अब्दुल आदील उर्फ सलाम हे सर्व तलवारी घेवून चौकात फिरून बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना धमकावत होते. यामुळे परिसरात दशहत निर्माण झाली होती. छगनलाल फुटवेअर समोर आमरोडवर चार जण हातात तलवारी घेवून व्यापारी लोकांना धमकावताना दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्या घराची झडती घेऊन पोलिसांनी १० तलवारी हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.