ETV Bharat / state

विवाहितेवर चाकूचे वार करुन आरोपीचा पोबारा; पोलिसांनी आवळल्या हल्लेखोराच्या मुसक्या - आरोपी

खदान परिसरात विवाहितेवर हल्लेखोराने चाकूने वार करुन पोबारा केला होता. याप्रकरणी पोलिसांनी हल्लेखोराच्या मुसक्या आवळल्या आहेत.

हल्लेखोर
author img

By

Published : Jul 2, 2019, 4:35 PM IST

Updated : Jul 2, 2019, 6:10 PM IST

अकोला - विवाहितेवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आकाश मांडलेकर असे त्या आरोपीचे नाव आहे. आकाशने खदान परिसरात विवाहितेवर हल्ला केला होता. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

हल्लेखोर

चार दिवसाआधी आदर्श कॉलनी परिसरात रस्त्यावर आकाशने निशा इंगळे यांच्यावर चाकूने 8 ते 10 वार केले. घटनेनंतर आरोपी आकाश मांडलेकर फरार झाला होता. आकाशचा खदान पोलिसांबरोबर शहर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष पथक शोध घेत होते. दरम्यान आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास विशेष पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे आकाश अकोल्यातील बसस्थानाकाजवळ जूस सेंटरजवळ उभा असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकाने सापळा रचून आकाशला ताब्यात घेतले. पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने अकोल्यातून पळून जाण्याचा आकाशाचा बेत फसला. ही कारवाई विशेष पथकाचे उपनिरीक्षक अमित डहारे, विनय जाधव, राज चंदेल यांनी केली.

Intro:अकोला - खदान परिसरात झालेल्या विवाहित्यावर प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या विशेष पथकाला अटक करण्यात आज यश आले आहे. आकाश मांडलेकर असे आरोपीचे नाव आहे. Body: चार दिवसाआधी आदर्श कॉलनी भागात, भरदिवसा रस्त्यावर पतीने पत्नी निशा इंगळे यांच्यावर चाकूने 8 ते 10 वेळा हल्ला केल्याची घटना घडली होती. घटनेनंतर आरोपी आकाश मांडलेकर फरार झाला होता. आकाशचा खदान पोलिसांबरोबर शहर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष पथक शोध घेत होते. दरम्यान आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास विशेष पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आकाश अकोल्यातील बसस्थानाका जवळील एका जूस सेंटरजवळ उभा असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकाने सापळा रचून आकाशला ताब्यात घेतलं. पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने अकोल्यातून पळून जाण्याचा आकाशाचा बेत फसला. वेळीच सतर्कता पोलिसांनी दाखवली नसती तर आकाश अकोल्यातून पळून जाण्यास यशयशवी झाला असता. ही कारवाई विशेष पथकाचे पीएसआय अमित डहारे, विनय जाधव, राज चंदेल यांनी केली.Conclusion:सूचना - सोबत व्हिडीओ आहे.
Last Updated : Jul 2, 2019, 6:10 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.