ETV Bharat / state

अकोल्यात ४५ वर्षीय महिलेवर प्रियकराच्या भावासह मित्रांचा सामूहिक बलात्कार

एकाच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या २७ वर्षीय युवकासोबत ४५ वर्षीय महिलेचे सूत जुळल्यानंतर ते दोघेही एकत्र राहत होते. मुलाकडील नातेवाईकांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे मुलाचा मोठा भाऊ त्या महिलेला 'तुला घरी घेऊन जातो, असे करू नका', असे सांगून तिला घरी नेण्यासाठी बुधवारी रात्री आला. यावेळी महिलेला घेवून जाणाऱ्या मुलाचे ३ मित्र हे त्यांच्यासोबत होते. दरम्यान, ते येवता मलकापूर रोडवर एका अंधाऱ्या ठिकाणी थांबले. त्यानंतर त्या महिलेला दुचाकीवरून खाली उतरून तिला अंधारात नेले आणि तिथे तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला.

एमआयडीसी पोलीस ठाणे
author img

By

Published : May 2, 2019, 5:34 PM IST

अकोला - येवता ते मलकापूर रोडवर ४५ वर्षीय महिलेवर ४ ते ५ तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. यासंदर्भात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेतले आहे. इतर तिघांचा शोध सुरू आहे. दरम्यान, महिलेवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती देताना एमआयडीसी पोलिस ठाणेदार किशोर शेळके

एकाच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या २७ वर्षीय युवकासोबत ४५ वर्षीय महिलेचे सूत जुळल्यानंतर ते दोघेही एकत्र राहत होते. मुलाकडील नातेवाईकांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे मुलाचा मोठा भाऊ त्या महिलेला 'तुला घरी घेऊन जातो, असे करू नका', असे सांगून तिला घरी नेण्यासाठी बुधवारी रात्री आला. यावेळी महिलेला घेवून जाणाऱ्या मुलाचे ३ मित्र हे त्यांच्यासोबत होते. दरम्यान, ते येवता मलकापूर रोडवर एका अंधाऱ्या ठिकाणी थांबले. त्यानंतर त्या महिलेला दुचाकीवरून खाली उतरून तिला अंधारात नेले आणि तिथे तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला.

अत्याचारानंतर आरोपींनी महिलेला तिथेच सोडले. दरम्यान, महिलेला चक्कर आल्याने ती खाली पडली. त्यामुळे ती उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला त्रास कशामुळे होतो आहे, असे विचारल्यानंतर तिने आपबीती सांगितली. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याला माहिती दिल्यानंतर त्यांनी रुग्णालयात येऊन महिलेचे जबाब नोंदविले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून त्यातील आरोपींचा शोध घेतला.

याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दोघांना ताब्यात घेण्यात आले असून इतर तिघांचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणेदार किशोर शेळके यांनी दिली. अद्यापही आरोपींची नावे जाहीर करण्यात आली नसली तरी सर्व आरोपी शिवणी येथील रहिवासी असल्याचे ठाणेदार शेळके यांनी सांगितले.

राखणदारी करणाराही आरोपी

ज्यावेळी ४५ वर्षीय महिलेवर अत्याचार सुरू होता त्यावेळी एक आरोपी फक्त कोणी येत आहे का, याची राखणदारी करीत होता. दरम्यान, पोलिसांनी त्यालाही आरोपी केला आहे. आरोपींना मदत केल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.

Intro:अकोला - येवता ते मलकापूर रोडवरील अंधारा ठिकाणी 45 वर्षीय महिलेवर 4 ते 5 युवकांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेतले आहे. इतर तिघांचा शोध सुरू आहे. महिलेवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Body:एकाच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 27 वर्षीय युवकासोबत 45 वर्षीय महिलेचे सूत जुळल्यानंतर ते दोघेही एकत्र राहत होते. मुलाकडील नातेवाईकांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे मुलाचा मोठा भाऊ त्या महिलेला 'तुला घरी घेऊन जातो, असे करू नका', असे म्हणून तिला घरी नेण्यासाठी बुधवारी रात्री आला. महिलेला घेवून जाणाऱ्या मुलाचे 3 मित्र हे त्यांच्या सोबत होते. ते येवता मलकापूर रोडवरील अंधाऱ्या ठिकाणी थांबले. त्या महिलेला दुचाकीवरून खाली उतरून तिला अंधारात नेले. तिथे तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. त्या महिलेला तिथेच सोडल्यानंतर तिला चक्कर आली व ती खाली पडली. त्यामुळे ती उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात आली. वैद्यकीय अधिकारी यांनी तिला त्रास कशामुळे होतो आहे, असे विचारल्यानंतर तिने आपबीती सांगितली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला माहिती दिल्यानंतर त्यांनी रुग्णालयात येवून महिलेचे बयान नोंदविले. त्यानंतर घटनास्थळ पंचनामा करून त्यातील आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दोघे ताब्यात घेण्यात आले असून इतर तिघांचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणेदार किशोर शेळके यांनी दिली. अद्यापही आरोपींची नावे जाहीर करण्यात आली नसली तरी सर्व आरोपी शिवणी येथील रहिवासी असल्याचे ठाणेदार शेळके यांनी सांगितले.Conclusion:राखणदारी करणाराही आरोपी
ज्यावेळी 45 वर्षीय महिलेवर अत्याचार सुरू होता, त्यावेळी एक आरोपी फक्त कोणी येत आहे का म्हणून राखणदारी करीत होता. पोलिसांनी त्यालाही आरोपी केला आहे. आरोपींना मदत केल्याने त्याच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे.

सूचना - सोबत व्हिडीओ आणि एमआयडीसी पोलिस ठाणेदार किशोर शेळके यांचा बाईट.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.