ETV Bharat / state

पूर्वपदावर येणाऱ्या वाहतुकीत नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; पोलिसांसमोर आवाहन

तीन महिन्यांच्या कडक लॉकडाऊननंतर केंद्र सरकार, राज्य सरकारने हळूहळू टाळेबंदीत शिथिलता दिली. शिथिलता देताना मात्र सॅनिटायझर वापरावे, सोशल डिस्टनसिंग पाळावे, तोंडांवर मास्क बांधावे आदी नियम घालून दिले. परंतु, परिस्थिती पूर्वपदावर येत असताना शासनाने दिलेल्या नियमांकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे.

people are not maintaining social distance in akola
पूर्वपदावर येणाऱ्या वाहतूकीत नागरिकांकडून सोशल डिस्टनसिंगचा फज्जा
author img

By

Published : Aug 18, 2020, 6:12 PM IST

अकोला - लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले असले तरी मास्क आणि सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. मात्र, हे नियम अकोल्यात पाळले जात नसल्याचे चित्र आहे. वाहतूक पोलीस आपले कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र, सामान्य नागरिक जबाबदारीने वागताना दिसत नाही. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना नागरिकांचा हा निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो.

तीन महिन्यांच्या कडक लॉकडाऊननंतर केंद्र सरकार, राज्य सरकारने हळूहळू टाळेबंदीत शिथिलता दिली. शिथिलता देताना मात्र सॅनिटायझर वापरावे, सोशल डिस्टनसिंग पाळावे, तोंडांवर मास्क बांधावे आदी नियम घालून दिले. तर वाहनचालकांनी डबलसीट दुचाकी चालवू नये, कार चालकांनाही निर्बंध लावले. सुरुवातीला पोलिसांनी याबाबत कडक कारवाई केली. नंतर याबाबत वाढता विरोध लक्षात घेता थोडीफार शिथिलता देण्यात आली. परंतु, परिस्थिती पूर्वपदावर येत असताना शासनाने दिलेल्या नियमांकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे.

पूर्वपदावर येणाऱ्या वाहतूकीत नागरिकांकडून सोशल डिस्टनसिंगचा फज्जा
पोलिसांकडून नियमित कारवाई सुरू आहे. वाहनचालकांसाठी दिलेले नियम काटेकोर पाळण्यात यावे, यासाठी पोलीस, वाहतूक पोलीस हे तैनात आहेत. टाळेबंदीच्या काळातही कर्तव्य बजाविणाऱ्या वाहतूक पोलिसांना या परिस्थितीत वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. नित्य कर्तव्य असले तरी वाहतूक व्यवस्था कोलमडू नये, याची काळजी घेत आहेत. टाळेबंदीपासून तर आतापर्यंत वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम आणि कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 58 वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर एक हजार 200 वाहने जप्त केली आहेत. यातून 26 लाख 39 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.