ETV Bharat / state

पळविलेले आयआरबीचे केंद्र तेल्हारा येथेच ठेवा; बटालियन कॅम्प बचाव कृती समितीची मागणी

author img

By

Published : Aug 10, 2019, 10:26 PM IST

Updated : Aug 10, 2019, 10:56 PM IST

तेल्हारा तालुक्यातील तळेगांव वडनेर व मनात्री मंजूर झालेला बटालियन कॅम्प कायम ठेवण्यात यावा, यासाठी बटालियन कॅम्प बचाव कृती समिती आणि अकोट विधानसभा क्षेत्रातील समस्त नागरिकांनी आज पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना निवेदन दिले. याबाबत पालकमंत्री यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल असे सांगून, समितीच्या काही प्रतिनिधींनाही यावेळी पाठवा, असे सांगितले.

people-from-akola-demands-to-keep-the-irb-camp-5-in-telhara-district-as-previously-planned

अकोला - तेल्हारा तालुक्यातील होणारा आय.आर.बी. (भारत राखीव बटालियन कॅम्प क्र. ५) शासनाने सिसा उदेगांव, हिंगणा शिवार येथे हलविण्यात आल्यामुळे आमच्या तालुक्यातील होणारा विकास थांबणार आहे. तसेच, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना उपलब्ध होणारा रोजगार सुध्दा थांबणार आहे. त्यामुळे, तरूण पिढीवर उपासमारीची वेळ येईल. हे लक्षात घेता, हा कॅम्प संबंधित अधिकाऱ्याने मंजुर केलेल्या पुर्वीच्या तळेगांव वडनेर, मनात्री येथेच कायम ठेवण्यात यावा अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. असे न झाल्यास, आम्हाला तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न लक्षात घेता जनआंदोलन करावे लागेल असा इशारा देखील यावेळी नागरिकांनी दिला.

पळविलेले आयआरबीचे केंद्र तेल्हारा येथेच ठेवा; बटालियन कॅम्प बचाव कृती समितीची मागणी

तेल्हारा तालुक्यातील आय.आर.बी. ५ कॅम्पला मंजुरी मिळाली होती. कॅम्पला मंजुरी मिळण्यापूर्वी राखीव बटालियन कॅम्पच्या समादेशक व महानिरिक्षक यांनी प्रत्यक्ष जागेवर जावुन पाहणी केली. सकारात्मक अहवाल दिल्यामुळे कॅम्पला मंजुरी मिळाली असता, ऐन वेळी हा कॅम्प दुसरीकडे पळविण्यात आल्यामुळे, मतदार संघातील जनतेवर मोठा अन्याय झालेला आहे. त्यामुळे तालुक्यातील जनता नाराज आहे. तरी सदरहु तो कॅम्प परत तेल्हारा तालुक्यात आणला नाही, तर पूर्ण अकोट विधानसभा क्षेत्राच्या वतीने जनआंदोलन छेडण्यात येईल. याची पुर्ण जबाबदारी शासनावरच राहील, असा इशारा नागरिकांनी दिला.

याबाबत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी नागरिकांची बाजू ऐकून घेतली. बटालियन कॅम्प बचाव कृती समितीच्या काही जणांना मुंबई येथे बोलावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले.

Intro:अकोला - तेल्हारा तालुक्यातील तळेगांव वडनेर व मनात्री येथील २०० एकर शेतात मंजूर झालेला बटालियन कॅम्प कायम ठेवण्यात यावा, यासाठी बटालियन कॅम्प बचाव कृती समिती अकोट विधानसभा क्षेत्रातील समस्त नागरिकानी आज पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना निवेदन दिले. याबाबत पालकमंत्री यांनी मंगळवारी मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल असे सांगून समितीच्या सदस्यांची समजूत काढून काही प्रतिनिधी यांनाही पाठवा, असे त्यांनी सांगितले. Body:तेल्हारा तालुक्यातील होणाऱ्या आय.आर.बी. (भारत राखीव बटालियन कॅम्प क्र.५) हा शासनाने सिसा उदेगांव, हिंगणा शिवार येथे हलविण्यात आल्यामुळे आमच्या तालुक्यातील होणारा विकास थांबणार आहे. तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना उपलब्ध होणारा रोजगार सुध्दा थांबणार आहे. त्यामुळे तरूण पिढीवर उपासमारीची वेळ येणार आहे. ज्यामुद्यावर संबंधित अधिकाऱ्याने मंजुर केलेल्या पुर्वीच्या तळेगांव वडनेर, मनात्री येथेच कायम ठेवण्यात यावा, अन्यथा आम्हाला तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न लक्षात घेता
जनआंदोलन करावे लागेल. तेल्हारा तालुक्यातील आय.आर.पी. (भारत रखीव बटालियन कॅम्प क्र.५ कॅम्पला मिळाली होती. ती कॅम्पला मंजुरी मिळण्यामुर्वीच राखीव बटालियन कॅम्पच्या समादेशक व महानिरिक्षक यांनी प्रत्यक्ष जागेवर जावुन पाहणी केली. सकारात्मक अहवाल दिल्यामुळे कॅम्पला मंजुरी मिळाली असता येन
वेळेवर हा कॅम्प दुरारीकडे पळविण्यात आल्यामुळे मतदार संघातील जनतेवर मोठा अन्याय झालेला आहे. त्यामुळे तालुक्यातील जनता नाराज आहे. तरी सदरहु तो कैम्प परत तेल्हारा तालुक्यात आणला नाही तर पुर्ण अकोट विधानसभा क्षेत्राचे वतीने जनआंदोलन छेडण्यात येईल. याची पुर्ण जबाबदारी शासनावरच राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला. याबाबत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी नागरिकांची बाजू एकूण घेतली. बटालियन कॅम्प बचाव कृती समितीच्या काही जणांना मुंबई येथे बोलावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले. Conclusion:
Last Updated : Aug 10, 2019, 10:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.