ETV Bharat / state

अकोला : लहान मुलांसाठी पेडियट्रिक टास्क फोर्स; आरोग्य उपसंचालकांनी दिली माहिती

तिसऱ्या लाटेत सर्वात जास्त धोका हा लहान मुलांना असल्याचे बोलल्या जात असल्याने त्यासाठी पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात लहान मुलांसाठी पेडियट्रिक टास्क फोर्स तयार करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक (डीडी) डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली.

akola Pediatric Task Force news
akola Pediatric Task Force news
author img

By

Published : Jul 31, 2021, 10:35 PM IST

अकोला - कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या दुष्टीने आरोग्य विभागाकडून तयारी करण्यात येत आहे. या तिसऱ्या लाटेत सर्वात जास्त धोका हा लहान मुलांना असल्याचे बोलल्या जात असल्याने त्यासाठी पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात लहान मुलांसाठी पेडियट्रिक टास्क फोर्स तयार करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक (डीडी) डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली.

प्रतिक्रिया

'सध्या तपासणी ही कमी झाल्या आहेत' -

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत सर्वात जास्त प्रमाणात ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाला होता. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर वाढल्याने त्याचा ही पुरवठा रुग्णांना करण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरली होती. त्यामुळे या लाटेत रुग्णांच्या मृत्यूची संख्या जास्त प्रमाणात वाढली होती. तर दुसरीकडे या लाटेत लहान मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारचे निर्बंध लावण्यात आले होते. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून मृत्यूदरही कमी झाला आहे. तरीही प्रशासनाकडून रुग्ण संख्या वाढू नये, यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासोबत संसर्ग होणाऱ्या ठिकाणी गर्दी होवू नये, याची काळजी घ्यावी, असे आदेश शासनाने दिले आहे. सध्या तपासणी ही कमी झाल्या आहेत. तसेच लसीकरण ही वाढले आहे.

'मुलांवर तातडीने उपचार व्हावे, यासाठी वेगळे वॉर्ड' -

दुसरीकडे या दरम्यान ऑक्सिजन पुरवठा कमी पडू नये, यासाठी अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचा प्लांट उभा करण्यात येत आहे. 500 लिटरचा हा प्लांट आहे. त्यासोबत लिक्विड ऑक्सिजन प्लांट ही उभा राहत असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. चव्हाण यांनी दिली. तसेच तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात पेडियट्रिक टास्क फोर्स उभी करण्यात आली आहे. मुलांवर तातडीने उपचार व्हावे, यासाठी वेगळे वॉर्ड तयार करण्यात आले आहे. तसेच या टास्क फोर्सच्या मार्गदर्शनाखाली मुलांवर उपचार होणार आहे. औषध, इंजेक्शन, ऑक्सिजन आणि बेडची कुठलीही कमतरता भासू नये, याचीही वेळप्रसंगी तयारी करण्यात येणार असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा - महाराष्ट्रात झिकाचा आढळला पहिला रुग्ण, पुरंदर तालुक्यातील 50 वर्षीय महिलेला लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.