ETV Bharat / state

घराच्या छतावर 'स्कूल पार्क' उघडून शिक्षकाने लहानग्यांना दाखविली 'प्रकाशवाट'

author img

By

Published : Jun 4, 2021, 3:43 PM IST

Updated : Jun 4, 2021, 4:54 PM IST

गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी हे शाळेत न जाता ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत. यामुळे विद्यार्थी मोबाइलवरच जास्त वेळ घालवीत आहेत. मैदानी खेळांपासून ते दूर गेले आहेत. यावर उपाय म्हणून एका चित्रकला शिक्षकाने 'स्कूल पार्क' तयार केला आहे. हा स्कूल पार्क घराच्या गच्चीवर 800 स्क्वेअर फिट जागेत बनविला आहे.

'स्कूल पार्क'
'स्कूल पार्क'

अकोला - देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे देशातील शाळा बंद पडल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी हे शाळेत न जाता ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत. यामुळे विद्यार्थी मोबाइलवरच जास्त वेळ घालवीत आहेत. मैदानी खेळांपासून ते दूर गेले आहेत. यावर उपाय म्हणून एका चित्रकला शिक्षकाने 'स्कूल पार्क' तयार केला आहे. हा स्कूल पार्क घराच्या गच्चीवर 800 स्क्वेअर फिट जागेत बनविला आहे. यामुळे मुलांना कालबाह्य झालेल्या गोष्टींची माहिती मिळत आहे. तसेच अभ्यासक्रमासोबतच त्यांना खेळही खेळता येत आहे. हा अनोखा उपक्रम मूर्तिजापूर येथील प्रकाश निरखे या शिक्षकाने केला आहे.

शिक्षकाने घराच्या छतावर 'स्कूल पार्क' उघडून लहानग्यांना दाखविली 'प्रकाशवाट'

घराच्या छतावर सुरू केले स्कूल पार्क

जेव्हा माणसाच्या हाताला काम नसते तेव्हा डोक्यात विविध चित्रकलेच्या कल्पना जागृत होतात. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर लागू असलेल्या संचारबंदीच्या काळात अशीच एक भन्नाट कल्पना चित्रकार प्रकाश निरखे यांना सुचली. त्यांनी या संकल्पनेतून आपल्या घराच्या छतावर स्कूल पार्क सुरू केले. या माध्यमातून लहानग्यांना विरंगुळासह ज्ञानार्जनही मिळत आहे. त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे. या उपक्रमामुळे मुलांना शिक्षणाची आवड त्यासोबतच मैदानी खेळही खेळायला मिळत आहे.

प्रकाश निरखे यांचा आगळा वेगळा प्रयोग

मूर्तिजापूर येथील प्रकाश निरखे यांचे वडील डॉ. सुरेश निरखे हे एक शिक्षक होते. त्यांनी सामाजिक दायित्व स्वीकारून अनेक चित्रे रेखाटली आहेत. त्यांचाच चित्रकलेचा वारसा जोपासत प्रकाश यांनी सुद्धा अनेक सुंदर चित्रे रेखाटली आहेत. प्रकाश हे मूर्तिजापूर येथील आदर्श विद्यालयात नोकरी करतात. संचारबंदीच्या काळात शाळा बंद असल्याने ते दोन महिने घरात बसून होते. अशातच त्यांच्यातील कल्पक कलाकार जागा झाला. त्यांनी आपल्या कुंचल्यातून छतापर्यंत घराचे संपूर्ण चित्रच बदलले. संचारबंदीच्या कालावधीत लहानग्यांना घर पिंजऱ्यासारखे वाटत असताना त्यांच्या जीवनावर शारीरिक व मानसिक विपरीत परिणाम होऊ नये, याचे भान राखत प्रकाश निरखे यांनी हा आगळा वेगळा प्रयोग केला आहे.

लहानग्यांसाठी लक्षवेधक ठरतेय स्कूल पार्क

शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असताना त्यांनी नेमका हाच धागा पकडून आपल्या घराच्या छतावर अनेक टाकाऊ वस्तूंपासून शैक्षणिक साधनांची निर्मिती केली आहे. एवढेच नव्हे तर या छतावर त्यांनी झोपाळ्यासह घसरगुंडीही लावली आहे. यात त्यांनी घराच्या पायऱ्यापासून ते छतापर्यंत चित्रकलेचा छंद जोपासत आगळ्या वेगळ्या कल्पनाकारी भिंतीचित्रे, टाकाऊ वस्तूचा सुरेख मेळ घालून सुंदर शैक्षणिक साधने निर्माण केली आहेत. यात तुटलेल्या प्लास्टिक कॅन, टायर, तेलाचे पिंप, कुलर यासारख्या अनेक वस्तूंचा समावेश आहे. त्यांनी निर्माण केलेले छतावरील स्कूल पार्क लहानग्यांसाठी लक्षवेधक ठरले असल्याने परिसरातील लहान बालके छतावर खेळण्यासह शैक्षणिक धडे घेतात.

लहानग्यांना मोठा दिलासा

प्रकाश निरखे यांनी छतावर निर्माण केलेली शाळा हसत खेळत शिक्षण व शैक्षणिक साधनांचा उत्तम नमुना ठरली आहे. यासाठी त्यांनी स्वतः पदरमोड करून संचारबंदीच्या काळात लहानग्यांना मोठा दिलासा देऊन ही प्रकाशवाट दाखविली आहे.

हेही वाचा - लॉकडाऊन उठवण्याबाबत राज्य सरकारचा युटर्न, महत्वाच्या निर्णयांमध्ये सरकारचाच गोंधळ

Last Updated : Jun 4, 2021, 4:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.