ETV Bharat / state

रुग्णांची श्वास कोंडी टळणार; जिल्ह्यात उभारला जातोय 'ऑक्सिजन लिक्विड टॅंक' - कृत्रिम ऑक्सिजनचा तुटवडा अकोला

कोरोनामुळे बाधित रुग्णांमध्ये प्राणवायूचे प्रमाण कमी होत असल्याचा निष्कर्ष आरोग्य विभागाने अभ्यासातून व्यक्त केला आहे. त्यामुळे या रोगाने ग्रस्त असलेल्यांना औषधोपचाराचा एक भाग कृत्रिम प्राणवायू देण्यात येत आहे. परंतु, राज्यात मोठ्‍या प्रमाणात प्राणवायूची मागणी वाढत असल्याने त्याचा तुटवडा भासत होता.

अकोला
अकोला
author img

By

Published : Nov 13, 2020, 3:50 PM IST

अकोला - कोरोनाबाधितांवर उपचारात कृत्रिम प्राणवायू सध्या मोठी भूमिका बजावत आहे. मध्यंतरी राज्यात कृत्रिम प्राणवायूचा तुटवडा भासत होता. राज्याच्या तुलनेत जिल्ह्याची स्थिती सुद्धा वेगळी नव्हती, कारण जिल्ह्यातील रुग्णांसाठी ६ हजार ७५१.५८ क्यूबिक मीटर कृत्रिम प्राणवायूची आवश्यकता होती. परंतु, आरोग्य विभागाकडे केवळ ६ हजार ३०० क्यूबिक मीटरच प्राणवायू उपलब्ध होता. म्हणजेच ४५१.५८ क्यूबिक मीटर प्राणवायूचा जिल्ह्यात तुटवडा होता. यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील तीन ठिकाणी प्रत्येकी दहा किलोचा 'लिक्विड प्लॉन्ट' उभा राहत आहे. यामुळे कोरोनाच नव्हे इतरही रुग्णांसाठी तातडीने प्राणवायू (ऑक्सिजन) पुरविणे शक्य होणार आहे.

जिल्ह्यात उभारला जातोय 'ऑक्सिजन लिक्विड टॅंक'

देशभरात थैमान घालत असलेल्या कोरोनामुळे बाधित रुग्णांमध्ये प्राणवायूचे प्रमाण कमी होत असल्याचा निष्कर्ष आरोग्य विभागाने अभ्यासातून व्यक्त केला आहे. त्यामुळे या रोगाने ग्रस्त असलेल्यांना औषधोपचाराचा एक भाग कृत्रिम प्राणवायू देण्यात येत आहे. परंतु, राज्यात मोठ्‍या प्रमाणात प्राणवायूची मागणी वाढत असल्याने त्याचा तुटवडा भासत होता. काही ठिकाणी तर रुग्णांना कृत्रिम प्राणवायू पुरवठा न झाल्याने ते दगावल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने सर्वच जिल्ह्यांना कृत्रिम प्राणवायूचा मुबलक साठा तयार ठेवण्याच्या सूचना त्यावेळी केल्या होत्या. त्यामुळेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा स्त्री रुग्णालय, मूर्तिजापूर सामान्य उपजिल्हा रुग्णालय येथे प्रत्येकी एक या प्रमाणे तीन 'ऑक्सीजन प्लॉन्ट' तयार करण्यात येत आहेत.

फुफ्फुसावर हल्ला आणि वायुकोश निकामी

वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांच्या मते कोरोना विषाणू घशावाटे थेट फुफ्फुसांवर हल्ला करतो. त्यामुळे रुग्णांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. विषाणूचा प्रभाव वाढल्यानंतर तो फुफ्फुसाच्या शेवटच्या भागातील वायुकोशावर सुद्धा हल्ला करतो. त्यामुळे रुग्णाला नैसर्गिक श्वास घेता येत नाही. परिणामी रुग्णाला कृत्रिम प्राणवायू देण्याची आवश्यकता भासते.

अशी आहे जिल्ह्याची स्थिती

  • जिल्ह्यात ९४ खाटा आयसीयू व ५०० खाटा आयसोलेशनच्या आहेत. त्यासाठी ६ हजार ७५१.५८ क्यूबिक मीटर प्राणवायूची आवश्यकता आहे.
  • कोरोनाग्रस्तांसाठी ४२ लहान व १८३ जम्बो प्राणवायू सिलींडर प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. त्यापैकी लहान सिलींडरमध्ये ६३ क्यूबिक मीटर व मोठ्या सिलींडरमध्ये एक हजार २८१ क्यूबिक मीटर कृत्रिम प्राणवायूचा साठा उपलब्ध आहे. याव्यतिरीक्त ४ हजार ९५६ क्यूबिक मीटर लिक्वीड मेडीकल प्राणवायूचासुद्धा साठा गरज पडल्यास वापरात आणला जावू शकतो. म्हणजेच जिल्ह्यात सध्या ६ हजार ३०० क्यूबिक मीटर कृत्रिम प्राणवायूचा साठा आहे.
  • उपलब्ध साठा ६ हजार ३०० क्यूबिक मीटर असला तरी जिल्ह्यासाठी ६ हजार ७५१.५८ क्यूबिक मीटर प्राणवायूची आवश्यकता आहे. म्हणजेच ४५१.५८ क्यूबिक मीटर कृत्रिम प्राणवायूचा तुटवडा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.